खोपोली ः विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन होवून सहा महिने होत आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. त्यासाठी खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीतील भाजप,अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाकडे तुल्यबळ उमेदवार असल्याने स्वतंत्र निवडणूक लढतील अशी परिस्थिती आहे.तर ठाकरे शिवसेना, शेकापक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षाची महत्वाची भूमिका असणार आहे.
चार जि.प.प्रभागातील तीन जागांवर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार तर एक ठिकाणी शिवसेना पक्षाचा उमेदवार निवडणून आला होता.परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीत दुफळी निर्माण होत दोन्हीही पक्ष वेगळे झालेत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची फौज विभागली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमधील शिंदे गटाचे महेंद्र थोरवे काही मताच्या फरकाने निवडणून आलेत तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात चांगलीच आघाडी घेतली होती.घारे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परतल्यामुळे खालापूर तालुक्यात ताकद वाढली आहे. भाजपकडे चारही जि.प.आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दिग्गज उमेदवार आहेत.निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
साजगांव जि.प.वार्डातून राष्ट्रवादीतून निवडणून आलेले नरेश पाटील हे सध्या भाजपमध्ये सक्रिय आहेत. तर याच ठिकाणाहून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे इच्छुक उमेदवार आहेत निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सनी यादव हेसुद्धा इच्छुक उमेदवार असल्याने पक्षश्रेष्ठी कोणता उमेदवार देतील याकडे लक्ष लागून आहे.
वडगांव जिल्हा परिषद प्रभागातून राष्ट्रवादी च्या पद्मा पाटील या निवडून आल्या आहेत तर आगामी निवडणुकीसाठी या मतदार संघात राष्ट्रवादी चे इच्छुक उमेदवारांची गर्दी असली तरी या प्रभागावर शिंदे गटाची नजर आहे. या ठिकाणी ठाकरे शिवसेना गटाची व भाजपा सह शेकाप ही लक्ष ठेवून असल्याने उमेदवारांची संख्या अधिक होणार यात शंका नाही.
चौक व वांसाबे जिल्हा परिषद हे दिनही प्रभाग उरण मतदार संघात असल्याने या ठिकाणी वासांबे जिल्हा परिषद प्रभागातून राष्ट्रवादी च्या उमाताई मुंढे व चौक जिल्हा परिषद प्रभागातून मोतीराम ठोबरे यांचे वर्चस्व आहे तरीही या ठिकाणी ठाकरे गट व भजापाची तसेच शेकापची मोठी वोटबँक आहे त्यामुळे ऐन वेळेस त्याच ताकतीने आव्हान देणारे उमेदवार मैदानात येऊ शकतात अशी सध्याची परिस्थितीत असली तरी पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
प्रत्येक पक्षाचे इच्छुक उमेदवार आपापल्या परीने पक्षाच्या व स्वतंत्र नागरिकांमध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर जात आहेत मात्र खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट तर शिंदे गट शिवसेना यांचे वैर्य लपून नसल्याने महायुती व महाविकास आघाडी बिघाडी होण्याचे चित्र असताना भाजपा ही स्वबळावर लढण्याची शक्यता आहे त्यामुळे काटे की टक्कर आगामी निवडणुकीत दिसणार यात शंका नाही.