पोलादपूर तालुक्यात बिबट्याचा संचार file photo
रायगड

Leopard News | पोलादपूर तालुक्यात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर ः तालुक्यातील खडकवणे कातळी दत्तवाडी च्या शिवारातील घनदाट जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात श्रीपत सकपाळ या शेतकर्‍याचा बैल (खोंड) ठार झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.

या घटनेची माहिती नागेश श्रीपत सकपाळ व पळचिल पोलीस पाटील आनंद निविलकर यांनी वन विभागाला कळविल्यानंतर वनपाल बाजीराव पवार, वनरक्षक अमोल रोकडे व टीमने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेमुळे या जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ओंबळी, फणसकोंड, कातळी खडकवणे दत्तवाडी जंगलात बिबट्याने दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT