रायगड

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक वळवली

Shambhuraj Pachindre

रायगड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.8) दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार वादळी पावसाने नडगाव गावाजवळ सायंकाळी दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती विभाग राष्ट्रीय महामार्ग महाड नगरपालिका व स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने रस्त्यावर आलेली दरड बाजूला काढली.

महामार्गावर दरड कोसळ्यामुळे वाहतूक शेजारी असलेल्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावर वाहतूक ठिकाणी आवश्यक असलेली यंत्रणा कार्यरत राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाकडून देण्यात आली आहे. महाड शहर व परिसरामध्ये दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात केली आहे.

SCROLL FOR NEXT