Panvel Ladies Bar, Social Club closed
पनवेल परिसरात छमछम बंद; लेडिज बार, सोशल क्लबना कुलूप  file photo
रायगड

पनवेल परिसरात छमछम बंद; लेडिज बार, सोशल क्लबना कुलूप

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे लेडीज बार चर्चेचा विषय ठरत असतो. एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना पनवेलमधील लेडीज बार बारचालकांकडून बंद ठेवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सोशल क्लब सुद्धा बंद ठेवण्यात आले असून सेक्शन गरम असल्याने बार बंद ठेवून कमालीची शांतता बाळगण्यात येत असल्याची प्रचिती सध्या येत आहे.

पनवेल तालुक्यात एकूण 24 सर्व्हिस आणि ऑर्केस्ट्रा बार आहेत. यामध्ये पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 10 बार, पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 9, कळंबोली 3 आणि तळोजा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 2 बारचा समावेश आहे. हे कागदोपत्री सर्व्हिस आणि ऑर्केस्ट्रा म्हणून ओळखले जात असले तरी प्रत्यक्षात या बारमधील लेडी वेटर्स प्रत्यक्षात नृत्यांगना म्हणून काम करतात. या नृत्यांगनावर पैसे उधळण्यासाठी ग्राहक लेडीज बारमध्ये येतात. या मागील आर्थिक गणितात उत्पादन शुल्क, पोलिस प्रशासन आणि इतर सर्व आस्थापनांना मॅनेज केले जाते. मात्र, अधिवेशनाच्या काळात हे बारमालक रिस्क न घेता हे बार बंद ठेवतात.

अधिवेशनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील या हेतूने हे बार जाणीवपूर्वक बंद ठेवले जातात. या व्यतिरिक्त सोशल क्लब सुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. अधिवेशनाच्या काळात पनवेलमध्ये हे सर्व धंदे बंद आहेत. सेक्शन गरम असल्याने हे व्यवसाय बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये शुकशुकाट सुरू आहे.

बारचालकांना वेळेत बंद करण्याच्या सूचना आम्ही यापूर्वीच दिल्या आहेत. याबाबत वेळोवेळी कारवाईदेखील सुरूच असते. नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनेवर कठोर कारवाई केली जाईल. - विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन, नवी मुंबई पोलिस आयुक्तालयउत्पादन शुल्क विभागामार्फत नियमांचे उल्लंघन करणार्या बारचालकांवर कारवाई करीत असतो. याकरिता आमच्या पथकाची नियमित गस्त या ठिकाणी असते. -
आर. आर.कोळे, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन
SCROLL FOR NEXT