रायगड : खाडीचे खारेपाणी शिरून नापीक झालेली भातशेती. 
रायगड

Rice Farming : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्यांनी घट

खारजमिनीत वाढ; हवामान बदल आणि वाढत्या नागरीकरणाचा भात पिकाला फटका

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि संस्कृतीशी जोडलेले पीक असलेल्या भातशेतीला गेल्या पाच वर्षांत (२०२० ते २०२५) खारजमीन क्षेत्रातील वाढ, वाढते नागरिकीकरण, निसर्गाचा लहरीपणा आणि हवामान बदलाचा प्रचंड फटका बसला आहे. मुसळधार पाऊस, अरबी समुद्रातील चक्रीवादळे आणि ऐन काढणीच्या वेळी येणारा अवकाळी पाऊस यामुळे कोकणातील 'भाताचे कोठार' आता गंभीर संकटात सापडले आहे. परिणामी, तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्यांनी घट झाली आहे.

कृषी विभागाच्या अंतिम आगाऊ अंदाजांच्या कलानुसार आणि प्रादेशिक संशोधन केंद्रांच्या अहवालांनुसार, कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत भात लागवडीखालील क्षेत्र, उत्पादकता आणि एकूण उत्पादन यात सातत्याने घसरण हाेत आहे. २०२०-२१ मध्ये कोकणात सुमारे ३.६५ ते ३.७० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लावणी केली जात होती, ती २०२४-२५ मध्ये घटून ३.२० ते ३.२५ लाख हेक्टरांवर आली आहे. म्हणजेच गेल्या ५ वर्षांत भातशेतीचे क्षेत्र १० ते १२ टक्क्याने घटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT