कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची लुटमार करणारी टोळी जेरबंद pudhari photo
रायगड

Raigad Crime : कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची लुटमार करणारी टोळी जेरबंद

आठ गुन्हेआले उघडकीस, 5 लाखांचा माल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

पनवेल शहर ः गुन्हे शाखा, नेरूळ यूनिट 5 पांनी नवनिभीत रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील सापे वामने ते दिवाण खवटी रेल्वे स्टेशन येथे रात्रीच्या वेळेस धांवणाऱ्या मेल एक्सप्रेस गाडीतील प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे दागीने व पर्स चोरणाऱ्या टोळीतील आरोपीतास जामखेड, जि. अहिल्यानगर येथून शिताफिने पकडून त्याच्या कडून जबरी चोरीच्या 05 गुन्ह्यातील एकूण 42 ग्रॅम वजनाचे 5,02,000/- रूपये किमतीचे सोन्याचे दागीने व इतर 03 गुन्ह्यातील इतर मालमत्ता हस्तगत करून एकुण 08 गुन्हे उघडकीस आणले.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नवनिर्मीत रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे होतील सापे वामने ते दिवाण खवटी रेल्वे स्टेशन येथे रात्रीच्या वेळेस आउटर सिग्नलला थांबणाऱ्या मेल एक्सप्रेस गाडीतील प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे दागीने व पर्स चोरी करणे या सदराखाली दाखल गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. हे शाखेच्या नेरूळ युनिट येथील पो.उप. निरी. लोणकर व स्टाफ यांना मिळाली. सदरची माहिती वपोनि, विजय खेडकर यांना दिली असता त्यांनी तात्काळ तीन टिम तयार करून त्यांना जामखेड, जि. अहिल्यानगर येथे वरिष्ठांच्या परवानगीने रवाना केले.

सदर टीम सतत सापळे रचून अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपीतांपैकी आरोपी नामे विनोद सखाराम जाधव यास जामखेड, जि. अहिल्यानगर येथून शिताफिने पकडून त्यास र अटक केली.सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे व तांत्रीक तपासात अटक आरोपी विनोद सखाराम जाधव याचेसह त्याचे साथीदार मारूती राजेंद्र झरे, सोनू सुरेश काळे, लाला मच्छिंद्र पवार, यांनी संगनमताने खालील प्रमाणे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले.

सदरचे आरोपी हे सापे वामने ते दिवाण खवटी रेल्वे स्टेशन कडे येण्यासाठी येणाऱ्या मार्गावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची माहिती घेवून जेथे सीसीटीव्ही नसतील त्या रोडने पाहिजे आरोपी मारूती झरे याच्या मारूती डिझायर गाडीने प्रवास करायचे. तसेच सदरची गाडी ही रेल्वे स्टेशन पासून लांब अंतरावर उभी करून तेथून पायी चालत गुन्ह्याचे घटनास्थळी जावून रेल्वे स्टेशन लगत असलेल्या झाडा झुडपात दवा धरून लपून बसायचे.

तसेच यातील पाहीजे आरोपी सोनू काळे हा सापे वामने ते दिवाण खवटी रेल्वे स्टेशन दरम्यानच्या स्टेशन वर रात्रीच्या वेळीस कोणती गाडी थांबू शकते याची रेल्वे ॲपवरून माहिती घेवून अंधाराचा फायदा घेवून गाडी आउटर सिग्नलला थांबल्यानंतर एकमेकांवर चढून गाडीच्या डब्याच्या उघड्या खिडकीतून हात घालून चोऱ्या करतात.अटक आरोपी विनोद सखाराम जाधव यास जामखेड, जि. अहिल्यानगर याचे पोलीस कस्टडी रिमांड मुदतीत युक्ती प्रयुक्तीने तपास करुन त्याने कबुली दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT