रायगड : नवीन वर्षात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उत्तर पश्चिम रेल्वेच्या विशेष ट्रेन धावणार असून रायगडसह कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना या ट्रेन्सचा लाभ घेता येणार आहे.
या विशेष ट्रेनमध्ये ट्रेन क्रमांक ०९७०१ खातीपुरा - मडगाव जंक्शन विशेष २८ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी खातीपुरा येथून १६:५० वाजता सुटेल. ही ट्रेन तिसऱ्या दिवशी ०४:४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९७०२ मडगाव जंक्शन - खातीपुरा स्पेशल ही ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) रोजी सकाळी ५:४० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी ४:१५ वाजता खातीपुरा येथे पोहोचेल.
ही गाडी जयपूर जंक्शन, किशनगड, अजमेर जंक्शन, बिजयनगर, भिलवाडा, चित्तौडगढ, रतलाम जंक्शन, वडोदरा जंक्शन, सुरत, वसई रोड जंक्शन, पनवेल जंक्शन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी रोड, रत्नागिरी रोड, वाळवा रोड, कानडाळवा रोड, राजवाडा रोड सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्टेशन या ठिकाणी थांबेल.
या ट्रेनमध्ये एकूण २० एलएचबी कोच - २ टायर एसी - ०२ कोच, ३ टायर एसी ०८ कोच, ३ टायर एसी (इकॉनॉमी) ०२ कोच, स्लीपर -०४ कोच, सेकंड सीटिंग ०२ कोच, जनरेटर कार - ०२ राहाणार आहेत. दरम्यान, सध्या पर्यटन हंगाम सुरु झालेला आहे. प्रवासीही विविध राज्याराज्यात प्रवासाचा आनंद लुटत आहेत. त्यांना रेल्वेचाच प्रवास सुरक्षित आणि सुखकर वाटत असल्याने त्यांची पहिली पसंती रेल्वेला असल्याचे दिसत आहे. यामुळे रेल्वेला वाढती मागणी आहे.
रेल्वे कोच कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय
नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या निमीत्ताने प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेवून, कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या दक्षिण रेल्वेने आपल्या ट्रेनमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त कोच वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या ट्रेनमध्ये २२६२९ / २२६३० तिरुनेलवेली दादर - तिरुनेलवेली एक्सप्रेस (साप्ताहिक) ट्रेनमध्ये २ टायर एसी- ०१, ३ टायर एसी०१, ३ टियर (इकॉनॉमी) - ०१, स्लीपर -०६, सामान्य - ०४, जनरेटर कार - ०१, एसएलआर - ०१ असे एकूण १५ कोच राहाणार आहेत.