Konkan Graduate Constituency
मतदारसंघातील पाचही जिल्हयातून सुमारे ६० टक्के मतदान झाले . File Photo
रायगड

Konkan Graduate Constituency| रायगडमध्ये किती झाले मतदान?

पुढारी वृत्तसेवा

रायगड : या निवडणुकीचे मतदान जुन्या पद्धतीप्रमाणे कागदाच्या मतपत्रिकेवर घेण्यात येत असल्याने शिवाय पसंतीक्रम देण्याचा असल्याने मतदारांचा गोंधळ उडत होता. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकारी मतदारांना मार्गदर्शन करताना दिसत होते. मध्येच येणाऱ्या पावसामुळेही दुपारच्या सुमारास मतदारांची मतदान केंद्रावर तारांबळ उडत होती. सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत पालघर जिल्हयात ४६.७७ टक्के, ठाणे जिल्हयात ४५.५४ टक्के, रायगड जिल्ह्यात ४८.५४ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ४९.५४ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्हयात ५९.५२ टक्के असे एकूण ४८ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान सिंधुदुर्ग जिल्हयात झाले आहे. मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत काही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. संपूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघातूनरायगड : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवारी (२६ जून) पार पडले. मतदारसंघातील पाचही जिल्हयातून सुमारे ६० टक्के मतदान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या मतदानाने मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार निरंजन डावखरे, काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्यासह १३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. १ जुलै रोजी नेरूळ येथे मतमोजणी होणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (२६ जून) मतदान घेण्यात आले. कोकण पदवीधर मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे असून एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मतदारसंघातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला. यावेळी मतदान केंद्राच्या ठराविक अंतरावर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी बुथ उभारले होते. या बुथवर सकाळपासूनच नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी होती. सकाळी मतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी गर्दी दिसून येत होते. मात्र सकाळी ११ वाजल्यानंतर मतदारांची गर्दी वाढली होती.

या निवडणुकीचे मतदान जुन्या पद्धतीप्रमाणे कागदाच्या मतपत्रिकेवर घेण्यात येत असल्याने शिवाय पसंतीक्रम देण्याचा असल्याने मतदारांचा गोंधळ उडत होता. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकारी मतदारांना मार्गदर्शन करताना दिसत होते. मध्येच येणाऱ्या पावसामुळेही दुपारच्या सुमारास मतदारांची मतदान केंद्रावर तारांबळ उडत होती. सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत पालघर जिल्हयात ४६.७७ टक्के, ठाणे जिल्हयात ४५.५४ टक्के, रायगड जिल्ह्यात ४८.५४ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ४९.५४ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्हयात ५९.५२ टक्के असे एकूण ४८ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान सिंधुदुर्ग जिल्हयात झाले आहे. मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत काही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. संपूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघातून

मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ६० ते ६५ पर्यंत पोहोचण्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, रायगड जिल्हयात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी किशन जावळे हे मतदान प्रक्रियेवर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेऊन होते. रायगड जिल्ह्यात ५४ हजार ३९१ मतदार आहेत. रायगड जिल्ह्यातील मतपेट्या अलिबागमधील आरसीएफ वसाहत येथे आणल्यानंतर त्या नेरुळ येथे रवाना होणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी १ जुलै २०२४ रोजी नवी मुंबईतील नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

कॉंटे की टक्कर

भाजपचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जाहीर पाठींबा दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी कोकणात काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा चंग बांधला असून त्यांना पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्येच काँटे की टक्कर ठरली आहे.

SCROLL FOR NEXT