रायगड

Kishore Thakur artist award | जेष्ठ चित्रकार किशोर ठाकूर यांना राज्य शासनाचा 'वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार' जाहीर

Vasudeo Gaitonde Kala Jeevan Gaurav Puraskar 2026 | या पुरस्कारामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून आणि कला क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

पुढारी वृत्तसेवा

रायगड : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्यावतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार' सन २०२३-२४ या वर्षासाठी रायगड जिल्ह्यातील पेण (कोप्रोली) येथील ज्येष्ठ चित्रकार किशोर ठाकूर यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या दृश्य कला क्षेत्रात सातत्याने आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना गौरवण्याासाठी राज्य शासनाने २०१९-२० पासून हा पुरस्कार सुरू केला आहे.

१० मार्च रोजी मुंबईत वितरण

हा पुरस्कार वितरण सोहळा १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता मुंबईतील ऐतिहासिक जहांगीर आर्ट गॅलरी येथे पार पडणार आहे. ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या (कलाकार विभाग) उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येईल.

कला क्षेत्रातील योगदान

किशाेर ठाकूर यांनी चित्रकला क्षेत्रात प्रदीर्घ काळ योगदान दिले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांच्या नावावर मोहोर उमटवली आहे. या पुरस्कारामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून आणि कला क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी पत्राद्वारे या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT