खोपोली : येथील कैरे एमआयडीसी मधील एसपीआर फार्मा कंपनी कंपनीला आग लागली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. खालापूर तालुक्यासह पनवेल व खोपोली शहरातील व विविध कारखान्यातील अग्निशमक दलाचे वाहने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
आग कशामुळे लागली हे अद्याप समोर आले नसली तरी मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडत असल्याने परिसरात घबराटीचे वातवरण निर्माण झाले आहे. या घटनेची बातमी समजताच प्रशासनाचे अधिकारी व मदत यंत्रणा दाखल झाली आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.