मुरूड जंजिरा : सुधीर नाझरे
दीपावली सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी मुरूड तालुक्यातील काशीद, मुरूड बीचवर पर्यटकांची मोठी मांदियाळी उतरल्याचे शनिवारी रोजी दिसून आले.पहिली आंघोळ आणि लक्ष्मीपूजनाचा विधी उरकून मुंबई- पुणे, ठाणे, पश्चिम महाराष्टातुन असंख्य पर्यटक दीपावली सुट्टी समुद्रकिनारी एन्जॉय करण्यासाठी डेरे दाखल झाले आहेत.
पर्यटकांची सुमारे एक हजार वाहने परिसरात दाखल झाल्याचे काशीद येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत जंगम आणि मुरूड येथील हिरा रेसिडेंसी चे मालक महेंद्र पाटील, साईगौरी रेस्ट हाऊस चे मालक आणि जिल्हा मच्चीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले. पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटल्याचे श्री बैले यांनी सांगितले. नवरात्र उत्सवा पर्यंत या भागातील पर्यटन पूर्ण थंडावले होते.त्यामुळे पर्यटन व्यावसायिक कमालीचे हवालदिल झाले होते.जंजिऱ्या जलदुर्गाकडे देखील पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले होते.
सर्व सामान्य पर्यटन व्यवसायिक तर हताश दिसून येत होता. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवसापासून चित्र बदलून काशीद, मुरूड आदी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा पूर लोटल्याचे चित्र दिसत आहे.पर्यटन व्यवसायाला पुन्हा उर्जितावस्था आली आहे. हाजारोंच्या संख्येने पर्यटकांची मांदियाळी समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी उतरली आहे. ठिकठिकाणी निवास व्यवस्था, हॉटेलिंग गजबजून गेले आहेत. दिवाळी सुट्टी असल्याने पर्यटकांची हजेरी स्थिर राहील अशी माहिती महेंद्र पाटील, सूर्यकांत जंगम यांनी दिली. मुरूड मध्ये दरबार रोडवर असणाऱ्या हॉटेल शोअर लाईन या पूर्ण शाकाहारी हॉटेलला अनेक पर्यटकांनी भेट देत शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्याचे हॉटेलचे मॅनेजर धर्मेश मोरे यांनी सांगितले.
समुद्रकिनारी नुकतेच सुरु झालेले पार्किंग मुले पर्यटकांची उत्तम सोया झाली आहे . पर्यटक हॉटेलमधून पार्किंगमध्ये येतात 2 पायऱ्या उतरल्यावर समुद्राच्या लाटांचा आनंद घेतात .किनारा सुशोभीकरांचा परिणाम पर्यटक वाढीवर नकीच झाला आहे. पर्यटकांनी 2 दिवस राहावे यासाठी पालिकेने पदामदुर्ग किल्ल्यात जयवहतूक सुरु करणे गरजेचे आहे ,साईड सिन पाहण्यासाठी पालिकेची गाडी असली पाहिजे ,दोन्ही किल्ले ,कुंद्यामांदाड लेणी ,दत्त मंदिर ,इदगा, गारंबी हि स्थळे पाहण्यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे.
जंजिऱ्यावर 5 हजार पर्यटकांची हजेरी
पर्यटकांच्या वर्दळीने जंजिरा जलदुर्ग गजबजला आहे.राजपुरी जेट्टी, खोरा बंदर जेट्टी, दिघी बंदर जेट्टीवरन पर्यटकांना जंजिऱ्यात जाण्याची जल प्रवासाची सुविधा असून असंख्य पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी येताना दिसत आहेत. सध्या हवामान उत्तम असून पर्यटनाला अनुकूल आहे.काशीद, नांदगाव, बारशिव समुद्रकिनाऱ्यावर येणारे विविध भागांतील पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी हमखास येतात असे दिसून आले. अनेक दिवस जंजिऱ्यावर पर्यटकांची संख्या रोडावली होती. अलिबाग - मुरूडचे पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी रविवारी सकाळी सांगितले की, शनिवारी, रविवारी दोन दिवसात जंजिरा पाहण्यासाठी सुमारे 5 हजार पर्यटकांनी भेट दिली.
जंजिऱ्यात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला रु 25/-- तिकीट असून 15 वर्षा खालील मुलांना विनामूल्य प्रवेश आहे.ऑन लाईन तिकीट काढल्यास रु20/- तिकीट आहे अशी माहिती येलीकर यांनी दिली. नांदगाव येथील सिद्धिविनायक देवस्थान, मुरूड येथील श्री दत्त देवस्थान, साळाव येथील गणेश देवस्थान ला देखील पर्यटक भेटी देऊन दर्शनाचा लाभ घेत आहेत. पर्यटन व्यवसायिकांच्या अनुमाना प्रमाणे शालेय सुट्टी असे पर्यंत पर्यटकांची वर्दळ अशीच राहील.सुट्टीमुळे कुटुंबासमवेत शेकडो पर्यटक आल्याचे दिसत आहेत.