पोलादपूर : समीर बुटाला
रायगड जिल्हा व रत्नागिरी जोडणारा महत्वाचा दुआ समजला जाणारा कशेडी भुयारी मार्ग दोन्ही बाजूने पूर्ण क्षमतेने वाहतुकीस वेगाने सुरू असल्याने वीर ते भरणे नाका पर्यतचा गणेशभक्तांचा प्रवास सुखकर विना अडथळा झाला आहे मात्र तीन चार वर्षे पूर्वीच्या प्रवास दरम्यानचे निर्सगाचे सौदर्य मात्र हिरावले असल्याची खंत या मार्गवरून ये-जा करणार्या प्रवासी वर्ग कडून करण्यात येत असली तरी प्रवास सुखकर व कमी वेळेत होत असल्याचा आनंद व्यक्त करत होते.
कशेडीच्या दोन्ही भुयारी मार्गिकेमधून मुंबई सह कोकणात जाणार्या हलकी वाहने अवजड वाहने एसटी बसेस मार्गस्त होत आहेत. सरळसोट मार्गिकेमुळे जुन्या मार्गावरील वळणावळणाचा त्रास कमी झाला असला तरी 12 महिने निसर्गाचे सौदर्य पासून प्रवासी वर्ग मुकला असला तरी त्याचा प्रवास सुसाट व कमी वेळेत होत असून इंधन बचत सह वेळही वाचला आहे.
नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक, सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी, यामुळे खडतर झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास हा नव्या तंत्रज्ञान चा सदुपयोग करत बोगद्याच्या निर्मिती करण्यात आली रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते 26 जानेवारीला 2019 मध्ये कामाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत करण्यात आला होता. या भुयारी मार्गिके मुळे प्रवासी वर्गाचा 45 मिनिटांचा घाट प्रवास सरळसोट मार्गिके द्वारे 09 मिनिटात पूर्ण होत आहे.
कशेडी बोगदा हा चौपदरीकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा पूर्वीचा कशेडी घाट महत्त्वाचा; पण तितकाच धोकादायक मानला जातो. तो पार करण्यासाठी वाहनांना 40 मिनिटांचा कालावधी लागत असे या घाटातून प्रवास करताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात; तर रसायनवाहू वाहने घाटात कलंडल्याने वाहतूक कोंडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
पर्यटकांबरोबरच गणेशोत्सव व शिमगोत्सवात येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या बोगद्यासाठी सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर बोगद्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी रुपये 502.25 कोटी खर्च करत आजमितीस पावणेदोन किलोमीटरचे एकदिशा मार्गाच्या वाहतुकीसाठी दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत दोन्ही बोगद्यांमध्ये प्रत्येकी 3 मार्गिका असून, बोगद्यांच्या आत 300 मीटरवर छेद मार्ग असून, एकूण 6 मार्गिका आहेत.
दोन्ही बोगद्यांची उंची 12 मीटर असून, लांबी 16 मीटर आहे. मुंबई गोवा महामार्ग भोगाव गावाच्या हद्दीत 70 मीटर अंतराचे दोन पूल मलेशिअन तंत्रज्ञान वापरून केले गेले आहेत 60 मीटर अंतराचा तिसरा पूल 220 मीटर, चौथा पूल 60 मीटर आणि भोगाव बाजूच्या बोगद्याजवळ 100 मीटर अंतराचा पूल असे एकूण 6 पूल 5 किलोमीटर अंतरात आहेत.
नाविन्यपूर्ण सुखद प्रवासाचा आनंद
दोन्ही बोगद्यांची तोंडे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशेडी गावच्या हद्दीत उघडत असून, कशेडी बोगद्यांपासून हॉटेल अनसूया फाट्यापर्यत नवीन महामार्गाच्या सव्वातीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर कशेडी बोगद्याकडून 60 मीटरचे 4 पूल आणि हॉटेल अनसूयापर्यंतच्या महामार्गाच्या फाट्यापर्यंत 20 मीटर अंतराचे दोन पूल आहेत. या दोन्ही बोगद्यांची लांबी 2.40 किलोमीटरचे आहेत, त्यामुळे या बोगद्यातून प्रवास करताना प्रवासी वर्गाला नाविन्यपूर्ण सुखद प्रवासाचा आनंद घेता येत आहे. या बोगद्यामुळे वाहनचालकांना वळणा-वळणाच्या घाटातून गाडी नेण्याचीही कसरत करावी लागली नाही.