पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटत भोगाव गावच्या हद्दीत सन 2005 पासून रस्ता खचण्याचे सातत्य कायम असून, या ठिकाणी दरड कोसळण्याचे सातत्य कायम राहिले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणात नव्याने झालेल्या महामार्गावर तर कधी जुन्या महामार्गावर दरड कोसळत असून या ठिकाणी वारंवार रस्ता खोल खचत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवासी जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सन 2005 च्या अतिवृष्टीमध्ये कशेडी घाटातील जुन्या मार्गावर भोगाव हद्दीत महामार्ग लेव्हल पासून सुमारे 90 ते 105 फूट लांब आणि चार ते पाच फूट खोल खचलेल्या रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली आहे मात्र संबंधित बांधकाम विभाग व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवासी जनतेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या ठिकाणी उन्हाळ्यात आणि जून महिन्यातही सुरू असणारा रस्ता दुरुस्तीचे काम ठेकेदार आणि महामार्ग प्रशासनाकडून धीम्या गतीने सुरू असलेले काम कालांतराने अद्याप बंदच आहे तात्पुरती वगळता या ठिकाणी कोणतेही काम किंवा ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. मात्र येत्या आठ दिवसावर गौरी गणपती सण येऊन ठेपला असताना या ठिकाणी सातत्याने खचणारा महामार्ग आणि कोसळणार्या दरडीचा भाग यामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकां कडून भीती व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरातील 26 गाव वाडी वस्तीतील लोकांचा दररोज या धोकादायक मार्गावरून सुरू असणारा प्रवास हा चिंतेचा विषय बनला आहे.