रायगड

Farmers Protest: टोरंटच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक

आदिवासींच्या समस्या दूर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना साकडे; प्रकल्पग्रस्तांना शिवसेना उबाठाचे समर्थन

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: कर्जत तालुक्यात तीन हजार मेगावॅट क्षमतेचा प्रस्तावित टोरंट जलविद्युत ठिकाणच्या आदिवासी लोकांनाच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे होणारा टोरंट कंपनीचा प्रवेश हा रोखला जावा व त्यांना होणारा त्रास दूर व्हावा. अशी मागणी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माध्यमातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन दिले आहे.

कर्जत तालुक्यात तीन हजार मेगावॅट क्षमतेचा प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पाकरीता हा तालुक्यातील भीमाशंकर अभयआरण्या लगत आसणाऱ्या पोटल, साई डोंगर, आंबोट, पाली व आदिवासी वाड्यांसह या गावांच्या परिसरातील शेतकऱ्याची व वन विभाग अशी सुमारे 377 हेक्टर जमिन ही संपादित होणार आहे.

यापैकी 600 एकर ही जमिन वन विभागाची जागेचा समावेश आहे. या टोरंट जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. तर टोरंट कंपनीकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे जागेमध्ये होणारी बेकायदेशीर घुसखोरी व अतिक्रमण रोखण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार टोरंट जलविद्युत प्रकल्पा विरोधात कर्जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उभा राहाणार असल्याची भूमिका ही पक्षाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली आहे.

टोरंट जलविद्युत प्रकल्पासंदर्भात 3 सप्टेंबर 2025 रोजी गौरकामत येथे या प्रकल्पासाठी पर्यावरणीय पहीली जनसुनावणी पार पडली, ज्याला स्थानिकांनी विरोध दर्शवत प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक होऊन, जनहित याचिका दाखल करण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली.

यावेळी राजकीय पक्षांकडून देखील विरोध दर्शविण्यात आला होता. यानंतर या टोरंट प्रकल्पामुळे मोठया प्रमाणामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास, जंगल नष्ट होणे आणि आदिवासी बांधवानासह स्थानिकांच्या उपजीविकेवर ही मोठा परिणाम होणार असल्याने, हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सद्यस्थितीत टोरंट प्रकल्पाविरोधात स्थानिक लोकांसह पर्यावरणप्रेमी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय पक्षांमधून मोठा जनआक्रोश होत आहे. तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हजारो लोकांना तात्पुरता रोजगार मिळण्याची शक्यता असली तरी, सध्या या भागातील जैवविविधतेसाठी मात्र मोठा धोका निर्माण होणार असल्याचे देखील विरोधांडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे होणाऱ्या दोन प्रस्तावित धरणांना देखील स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे. असे असताना, देखील टोरंट कंपनीच्या पाली कोतवाल खलाटी येथे होत असलेल्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध आहे.

त्या भागात या टोरंट प्रकल्पासाठी वन विभागाने जमीन दिली असल्याचे बोलले जात असून, सध्या त्या भागात जमिनीमधील माती आणि दगड परीक्षण हे टोरंट कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. याकरीता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणती ही सुचना अथवा कायदेशीर नोटीस न देता थेट टोरंट कंपनीच्या कामगारांची घुसखोरी ही खासगी व वनक्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या दली जमिनीमध्ये देखील सुरू आहे.

या टोरंट प्रकल्पाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोध करण्यात येत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर कर्जत तालुका शिवसेना उबाठा पक्षाकडून विरोध केला जात आहे.

स्थानिक आदिवासा लोकांना संरक्षण

आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नावे दळीपट्टे असलेली जमीन असताना, देखील त्या जमिनीत सुरू असलेले अतिक्रमण तसेच होत असलेली टोरंट कंपनीची दादागिरी रोखण्यात यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली असल्याने, याबाबत स्थानिक आदिवासा लोकांना संरक्षण देणार का? की टोरंट कंपनीचा अन्याय असाच सुरू राहाणार का? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उपस्थित होत होत असल्याने याबाबत न्यायाप्रती संदर्भातील उत्सुकता मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये वाढलेली दिसत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT