शंभर वर्षांपासून कर्जतच्या मिरची बाजारपेठेतील मिरचीचा ठसका कायम; दरात तिप्पट वाढ  Pudhari
रायगड

Karjat chilli rates: शंभर वर्षांपासून कर्जतच्या मिरची बाजारपेठेतील मिरचीचा ठसका कायम; दरात तिप्पट वाढ

मुंबई, ठाणे, पुण्यातील ग्राहकांची आजही गर्दी

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: मसाल्याच्या पदार्थांसाठी कर्जतच्या बाजारात मिळणाऱ्या मिरचीला महिलांची पसंती असते. त्यामुळे गेल्या 100 वर्षांपासून कर्जत येथील बाजारपेठ मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची आणि मसाले खरेदी करतात. गेल्या वर्षा पेक्षा दर दीड पट - दुप्पट असल्याने असल्याने मिरचीचा ठसका खूपच झाला आहे.

आपण तयार केलेले मसाले जास्त दिवस टिकतात. अशी अनेकांचे म्हणणे आहे. अशी कुटुंब वर्षभरासाठी मसाला तयार करून ठेवतात. ग्रामीण भागात लग्न सोहळ्यासाठी भोजनाला चांगली चव यावी लग्नकार्य ज्यांचे घरी आहे अशा कुटुंबात साधारण वीस ते पंचवीस किलो मसाला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. हा बाजार चार ते पाच महिने असतो आणि त्यात सुमारे दोन - अडीच कोटी रुपयांची उलाढाल होत असते.

दुकानांची संख्या कमी

कर्जत शहरातील महावीर पेठेत 10 - 12 दुकानांमध्ये मिरची व खडे मसाले विक्रीसाठी असतात. आज शहरातील बाजारपेठेत दुकानांची संख्या कमी झालेली आहे. मात्र कर्जतचे बाजारातील मिरची ही महिला वर्गात अधिक प्रिय आहे. हैदराबाद, गंटूर, तेलंगणा आदी भागातून मिरची या बाजारात येत असते. जयंतीलाल परमार, मदन परमार, शिवलाल गुप्ता हे व्यापारी आपल्या तीन-चार पिढ्यांपासून हा मिरचीचा व्यापार करतात.

मी 82 वर्षाचा असून 60 - 62 वर्षे कर्जत शहरात मिरची विकत असून जनतेचा विश्वास आम्ही मिळविला आहे. मात्र आमच्या नंतर पुढील पिढी या व्यवसाय करीलच याची खात्री नाही. तरी देखील पंकज, सचिन ही दोन्ही मुलं आणि सुनीता, टिना या दोन्ही सूना मदतीला असतात. त्यामुळे वर्षाकाठी 800 पोती मिरची विकण्यास मदत होते. एवढी वर्षे खात्रीने आणि सचोटीने व्यवसाय करीत असल्याने 15 तास मिरचीचे समोर असून देखील मी 82 वर्षांनंतरही प्रकृती उत्त्तम आहे.
- जयंतीलाल परमार, मिरची व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT