Karjat Assembly Constituency  Pudhari News Network
रायगड

Karjat Assembly Constituency | कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत

Maharashtra Assembly Polls | महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा
आनंद सपकाळ, नेरळ

विधानसभेच्या निवडणूका घोषित झाल्यापासून कर्जत-रवालापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडमोडीला वेग आला आहे. महायुतीमधील असलेल्या मित्रपक्षांमध्ये ही जागा आपल्या पक्षाला मिळावी म्हणून प्रयत्न देखील झाले. महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आ. महेंद्र थोरवे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने, महायुतीचे भाजप पक्षाचे किरण ठाकरे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने महायुतीच्या उमेदवाराला आव्हान निर्माण झाले होते. परंतू नामनिर्देशन अर्ज हा किरण ठाकरे यांनी मागे घेतल्याने व त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्ही कोणत्या व्यक्तीचे नाही. तर महायुतीचे काम करणार, असे वक्तव्य केल्याने त्यांच्यात आज ही नाराजी आहे का व ती महायुतीचे उमेदवार दूर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे सुधाकर घारे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदावार म्हणून निवडणूक लढविण्यासाठी दंड थोपटल्याने महायुतीच्या उमेदवारा समोर असलेले आवाहन, त्यामध्येच महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे नितिन सावंत हे उमेदवार म्हणून मैदानात असल्याने, कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये तिरंगी लढत होणार हे निशित झाल्या असून, या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवाराचे आव्हान असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

१८९ कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेना पक्षाचे महेंद्र सदाशिव थोरवे हे १,०२,२०८ मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश नारायण लाड यांचा पराभव करून विजयी झाले होते. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गट निमार्ण झाल्या नंतर महेंद्र थोरवे हे शिवसेना शिंदे गटात असल्याने व सध्या २०२४ ची विधानसभा निवडणुक होऊ घातल्याने माहायुतीचे उमेदावर म्हणून महेंद्र थोरवे हे पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतले आहे. तर त्यांना महायुतील घटक मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले सुधाकर घारे व महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नितिन सावंत यांचे तगडे आव्हान असल्याने, २०२४ ची निवडणूक ही या मतदारसंघात या तीन उमेदवारांमध्ये मुख्य तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे. तर १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले असुन, कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात सन २०२४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये पुरुष मतदार १ लाख ५८ हजार ३९४, महिला मतदार १ लाख ५८ हजार २०६, तर तृतीयपंथी मतदार ३ असे एकूण ३ लाख १६ हजार ६०३ मतदार हे नवनिर्वाचित आमदार कोण हे निश्चित करणार आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेना पक्षाचे महेंद्र सदाशिव थोरवे यांना १,०२,२०८ मते मिळाली, सुरेश नारायण लाड यांना ८४,१६२ मते मिळाली असल्याने, महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आल्याने व त्यावेळी त्यांच्या विजयामध्ये महायुतीतील मित्र पक्ष भाजपा यांचा व शेतकरी कामगार पक्षाचा खारीचा वाटा असल्याचे बोलले जात असल्याने, व यंदाच्या होऊ घातलेल्या निवडणूकीमध्ये शिवसेनेची मते विभागली असल्याने, व सुरेश भाऊ लाड यांना राष्ट्रवादी पक्षाची मिळालेली ८४,१६२ मते ही राष्ट्रवादी पक्षच्या फुटीनंतर अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाची असल्याची चर्चा व त्या मध्येच महायुतीचा राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार गट हा घटक पक्ष असल्याने, व त्या पक्षाचा तालुक्यातील सर्व मुख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सुधाकर घारे यांनी राजीनामा देत थेट अपक्ष उमेदवार म्हणून दंड थोपले असल्याने, थेट राष्ट्रवादी पक्षाची ८४,१६२ हजार मतापासुन महायुतीचे उमेदवार वंचित झाल्याची चर्चा मतदार संघात सुरू असल्याने, २०१४ मध्ये थोरवे यांना पडलेल्या एकूण १,०२,२०८ मतामध्ये भारतीय जनता पार्टी व शेतकरी कामगार पक्षाचा वाटा असल्याने, त्यामध्येच भारतीय जनता पार्टीचे कर्जत-खालापूर विधानसभा संर्पक प्रमुख किरण ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला परंतू पत्रकार परिषदेत आम्ही कोणत्या व्यक्तीचे नाही. तर महायुतीचे काम करणार, असे केलेले वक्तव्यातून पुढे येणारी नाराजी महायुतीचे उमेदवार दूर करणार का या कडे सर्वांचे लक्ष लागले असल्याने भाजपाची एक गटा मतदान होणार की मत विभागणार का? अशा प्रश्राची सुरू असलेली चर्चा त्यामध्येच शिवसेनेचे दोन गट पडल्याने भाजपा व शेकाप यांची मते वगळता उर्वरित मते ही शिब- सेना शिंदे गट व शिवसेना उध्दव बाळासाहेब गटात विभागणार असल्याने, व शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने, या मतदार संघात आघाडीचा धर्म पाळणार की त्यांच्या मताची ताकद कोणाच्या झोळीत टाकणार याकडे ही सर्वांचे लक्ष लागले असुन, कर्जत-रवालापूर विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्ष हा विजयी उमेदवारासाठी कींग मेकर ठरणार अशी चर्चा देखील जोर धरू लागली आहे. तर या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार सुधाकर परशुराम घारे यांचे मुख्य आवाहन असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT