रायगडमध्ये नरक चतुर्दशीऐवजी ज्येष्ठा गौरी विसर्जनाला सुट्टी Pudhari Photo
रायगड

Jyeshtha Gauri Visarjan 2024 | रायगडमध्ये नरक चतुर्दशीऐवजी ज्येष्ठा गौरी विसर्जनाला सुट्टी

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या सणाचा एक भाग म्हणजेच ज्येष्ठा गौरी विसर्जन मोठया उत्साहात साजरे केले जाते. त्यामुळे येत्या 12 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. 31 ऑक्टोबर 2024 रोजीची नरक चतुर्दशी यासणाची स्थानिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार 24 नोव्हेंबर 2023 अधिसूचना अन्वये सन 2024 या वर्षाकरीता सोमवार, 19 ऑगस्ट 2024 रोजी नारळी पोर्णिमा-रक्षाबंधन, मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 रोजी, गोपाळकाला, गुरुवार, 31 ऑक्टोबर 2024 रोजी, नरक चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या.

तथापि रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या सणाचा एक भाग म्हणजेच ज्येष्ठा गौरी विसर्जन मोठया उत्साहात साजरे केले जाते. त्यामुळे 24 नोव्हेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेली गुरुवार, 31 ऑक्टोबर 2024 रोजीची नरक चतुर्दशी यासणाची स्थानिक सुट्टी रद्द करुन त्याऐवजी गुरुवार, 12 सप्टेंबर 2024 रोजीची स्थानिक सुट्टी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केली आहे.

रायगड जिल्ह्यात ज्येष्ठा गौरी गणपतीपर्यंतचा गणेशोत्सवा सर्वाधिक साजरा होत असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT