पक्ष्यांच्या मुक्त संचाराने जेएनपीएचे सौंदर्य खुलले pudhari photo
रायगड

JNPA Port | पक्ष्यांच्या मुक्त संचाराने जेएनपीएचे सौंदर्य खुलले

पुढारी वृत्तसेवा

उरण : समुद्र व निसर्गसंपन्न विभागात असलेल्या जेएनपीए बंदर परिसरातील आधुनिक इको तंत्रज्ञानाचा वापर करीत येथील पाचही जलस्राोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. यामुळे जेएनपीए बंदर परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून परिसरात येणार्‍या विविध जातींच्या हजारो आकर्षक मुक्त पक्ष्यांचा संचारही वाढला आहे. निसर्गाने बहरलेल्या डोंगरदर्‍यात आणि मोकळ्या जागी अनेक जिवंत पाण्याचे झरे, पाणवठे, तलाव अस्तित्वात आहेत. या अस्तित्वात असलेल्या प्रशासन भवनसमोरील खालच्या बाजूला जुना शेवा गावाच्या पायथ्याशी, या गावातच असलेल्या शिवमंदिर आणि प्लाझा पार्किंगच्या शेजारी असे एकूण पाच नैसर्गिक जलकुंभ, पाणवठे, तलाव, विहिरी, नैसर्गिक झरे आहेत. सर्वच ऋतूंमध्ये ओलावा, पाणी कायम असल्याने विविध प्रकारचे पक्षी, सूक्ष्मजीव, जलजिवांची रेलचेल असते.

विविध पक्ष्यांचा संचार

लाल मुनिया, चिमणी, सुगरण, गुलाबी पिंच, कालशिर्ष भारीट, पर्वत कलर, चिरक, दयाळ, छोटा सातभाई, नर्तक, कोतवाल, सुतार, बैरागी, शेंदरी विष्फुलिफ, जेरडीनचा क्लोरॉप्सिस, पिपिट, करडा धोबी, चेस्टनट पोटाचा नटहॅच, फुलटोच्या गप्पीदास, राखी वटवट्या, शिंपी, कस्तुर, टकाचोर, राखी खाटीक, छोटा हिरवा राघू, तांबट,तांबडा होला, हरतालिका, नीलकंठ, खंड्या, भारद्वाज, सीगल आदी पक्षी येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT