JNPA Container Transport Delay Pudhari
रायगड

JNPA Container Transport Delay: जेएनपीए-सीएफएसमध्ये कंटेनर वाहतुकीला मोठा फटका; कोंडीसह खराब रस्त्यांमुळे ऑपरेशन्स विस्कळीत

यासंदर्भात 'कंटेनर फ्रेट स्टेशन असोसिएशन ऑफ इंडिया'ने सदस्य सीएफएस च्या वतीने सर्व संबंधितांना माहिती दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

उरण: जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी परिसंस्थेतील पोर्ट टर्मिनल्स आणि कंटेनर फ्रेट स्टेशन दरम्यान आयात-निर्यात कंटेनरच्या वाहतुकीला सध्या मोठा फटका बसला आहे.

सीएफएस ऑपरेटरच्या नियंत्रणाबाहेरील विविध कारणांमुळे ही वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून, यामध्ये प्रचंड विलंब होत आहे. यासंदर्भात 'कंटेनर फ्रेट स्टेशन असोसिएशन ऑफ इंडिया'ने सदस्य सीएफएस च्या वतीने सर्व संबंधितांना माहिती दिली आहे.

परिसरातील गंभीर वाहतूक कोंडी आणि विशेषतः चांदणी चौक परिसरातील वारंवार होणाऱ्या वाहतूक बंदचा मोठा परिणाम या वाहतुकीवर झाला आहे. तसेच एनएसआयसीटी, एनएसआयजीटी आणि जीटीआय या टर्मिनल्सच्या गेटवर होणाऱ्या गर्दीमुळे आयात कंटेनर वेळेवर बाहेर काढणे आणि निर्यात कंटेनर आत घेणे कठीण झाले असून, अनेक ठिकाणी निर्यात कंटेनर शट-आउट होण्याचे प्रकार घडत आहेत.

त्यातच सध्या सुरू असलेला मान्सून, पोर्ट परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्डे आणि साचलेले पाणी यांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. डीआरटी सीएफएस आणि इतर अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती व पायाभूत सुविधांच्या कामांमुळे ट्रेलर्सचा टर्नअराउंड टाईम वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT