अलिबाग : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि अलिबागचे आमदार जयंत पाटील यांनी अलिबागमध्ये आयोजित सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले, ‘ज्या महिला जाहीरपणे शिव्या देतात, त्यांना जिजाऊ पुरस्कार देणे हे राजमाता जिजाऊंचे घोर अपमान आहे.‘ अशी टीका त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यावर केली आहे.
यावेळी शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘राजमाता जिजाऊंनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, त्या कधीही कोणाला शिव्या देत नव्हत्या. आज कुणालाही जिजाऊ पुरस्कार मिळतोय; अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळाल्याने जिजाऊंनाही वाईट वाटले असते.“ त्यांनी सध्याच्या राजकारणाचा स्तर पाहून आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.
याच सभेत पाटील यांनी थळ जिल्हा परिषद मतदार संघातून सानिका सुरेश घरत यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. जयंत पाटील यांनी अलिबागच्या राजकीय इतिहासाची आठवण करून दिली. माजी आमदार नाना कुंटे यांच्या कर्तृत्वाचा आणि चारित्र्याचा उल्लेख करत त्यांनी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींचा दर्जा आणि सध्याची परिस्थिती यातील फरक स्पष्ट केला.