जरांगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क pudhari photo
रायगड

Jarange protest : जरांगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क

जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यार्ंसमवेत चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मुुंबईतील नियोजित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे.आंदोलनकर्त्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गाबाबत पोलिसांनी चर्चा करुन यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

पनवेल येथील मंथन हॉल सहा. पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली परिमंडळ 3 मधील मराठा मोर्चा समन्वयक यांची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान उपस्थित मराठा मोर्चा समन्वयक यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी येत्या शनिवारी (23 ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील यांनी बैठक आयोजित केले आहे.

सदर बैठकीदरम्यान मुंबईकडे जाणारा रोड निश्चित होईल. तसेच आपल्या सूचनेप्रमाणे आपण आम्हास मुंबईकडे जाणारा रोड बाबत अवगत केल्यास आम्ही सदरची माहिती नमूद बैठकीत देऊ असे सांगितले. तसेच आमच्या वतीने कुठेही आंदोलन, मोर्चा नसणार आहे. येणारा पाहुण्यांना पाणी, जेवण देण्याची व्यवस्था करण्याचे सध्या ठरले असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गजानन घाडगे, यांच्यासह कामोठा, कळंबोली, तळोजा, खान्देशवर, पनवेल तालुका, पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील 30 ते 35 मराठा मोर्चा समन्वयक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT