रायगड : मध्य-पूर्व आशियाई देशांमध्ये सध्या उद्भवलेल्या अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यातील अनेक नागरिक तिथे अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. रायगड जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण २० नागरिकांची यादी समोर आली असून, त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरू झाल्या आहेत.
पोलादपूर, उरण आणि सुधागड (पाली) तालुक्यातील नागरिक सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि दुबई या देशांत वास्तव्यास असून तेथे ते अडकलेले आहेत. यामध्ये सौदी अरेबियामध्ये पाेलादपूर तालुक्यांतील सवाद गावांतील तालेर्कर कुंटूंबातील ६ नागरिक आहेत. कुवेत मध्ये तार्लेकर, नेकवारे आणि पठाण कुटुंबातील ७ नागरिक तर दुबई मध्ये ७ नागरिक अडकलेले आहेत.
अडकलेल्या नागरिकांपैकी बहुतांश लोक नोकरी आणि रोजगारासाठी तिथे वास्तव्यास आहेत. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून बाहेर पडणे कठीण झाले असून, अनेक नागरिक आता सुरक्षितपणे मायदेशी परतण्यास इच्छुक आहेत.दुसरीकडे, सुधागड-पाली येथील उत्कर्ष राजेश मापारा हा विद्यार्थी शिक्षणासाठी दुबईत असून तो सध्या सुरक्षित असल्याचे आणि पालकांच्या संपर्कात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच उरणचे काही नागरिक पर्यटनासाठी गेले असताना तिथे अडकले आहेत.
रायगड जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण कक्ष या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या नागरिकांची माहिती राज्य सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात येणार असून, त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.
१. उत्कर्ष राजेश मापारा : मु. पाली, ता. सुधागड : दुबई - शिक्षणासाठी
२. कविश विजय घरत : मु. जसखार, ता. उरण : दुबई - पर्यटन व कौटुंबिक कार्यक्रम
३. प्रांजली विजय घरत : मु. जसखार, ता. उरण : दुबई - पर्यटन व कौटुंबिक कार्यक्रम
४. सर्फराज सुलतान तार्लेकर : मु. सवाद, ता. पोलादपूर : सौदी अरेबिया - नोकरीसाठी
५. अख्तर कासीम तालेकर : मु. सवाद, ता. पोलादपूर : सौदी अरेबिया - नोकरीसाठी
६. अजीम कासीम तालेकर : मु. सवाद, ता. पोलादपूर : सौदी अरेबिया - नोकरीसाठी
७. महमद अब्दुल गफुर तार्लेकर : मु. सवाद, ता. पोलादपूर : सौदी अरेबिया - नोकरीसाठी
८. असलम मेहमुद तार्लेकर : मु. सवाद, ता. पोलादपूर : सौदी अरेबिया - नोकरीसाठी
९. मैनुद्दीन फजल्दीन तालेकर : मु. सवाद, ता. पोलादपूर : सौदी अरेबिया - नोकरीसाठी
१०. जमीर शौकत तालेकर : ता. पोलादपूर परिसर : कुवेत - नोकरी/वास्तव्यास
११. जावेद महमुद तालेकर : ता. पोलादपूर परिसर : कुवेत - नोकरी/वास्तव्यास
१२. सुवेल जियारत तालेकर : ता. पोलादपूर परिसर : कुवेत - नोकरी/वास्तव्यास
१३. रतिक निजाम नैकवारे : ता. पोलादपूर परिसर : कुवेत - नोकरी/वास्तव्यास
१४. अलताद अब्बास पठाण : ता. पोलादपूर परिसर : कुवेत - नोकरी/वास्तव्यास
१५. अल्तमश अब्बास पठाण : ता. पोलादपूर परिसर : कुवेत - नोकरी/वास्तव्यास
१६. आयान जमीन तालेकर : ता. पोलादपूर परिसर : कुवेत - नोकरी/वास्तव्यास
१७. शाहिद आयनु कादिरी : रायगड : कतार - नोकरी/वास्तव्यास
१८. मुजाईद आयबु कादिरी : रायगड : कतार - नोकरी/वास्तव्यास
१९. शाहिद तोलकर : रायगड : कतार - नोकरी/वास्तव्यास
२०. सज्जाद सुलतान तालेकर : ता. पोलादपूर परिसर : दुबई - नोकरी/वास्तव्यास