तांब्याची वायर चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड pudhari photo
रायगड

Copper Wire Theft : तांब्याची वायर चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड

रायगड स्थानिक गुन्हे शाखेची शिळफाटा येथे मोठी कारवाई; ५ गुन्हे उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्याच्या विविध भागांतून महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉईल (वायर) चोरणाऱ्या एका अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तांब्याची वायर चोरणारा मुख्य आरोपी इमरान वारीसअली खान (वय २६ वर्षे, रा. शिळफाटा, जि. ठाणे) आणि चोरीचा माल स्वीकारणाऱ्या (स्क्रॅप डीलर) समीम महमद सरीफ खान (वय ३२ वर्षे, रा. शिळफाटा, जि. ठाणे) अशा दोन आरोपींना ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा (मुंब्रा) येथून अटक केली आहे. आरोपींकडून रोहा, महाड, माणगाव आणि पेण येथील तब्बल ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

रोहा पोलीस ठाण्यात ३१ मार्च २०२६ रोजी ट्रान्सफॉर्मर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा २१ मार्च ते ३१ मार्च २०२६ दरम्यान घडला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अलिबागचे पथक करत होते. तपासा दरम्यान, तांत्रिक विश्लेषण आणि एलसीबीचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी शिळफाटा, मुंब्रा येथे सापळा रचला. तेथून ट्रान्सफॉर्मरमधील तांबे चोरी करणारा आणि माल स्वीकारणारा अशा या दोघांना ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीतच त्यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी आरोपींना रोहा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही धडक कामगिरी रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

५९० किलाे तारेची चाेरी

या टाेळी विरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात मुख्य गुन्हा दाखल झाला, ज्याच्या तपासातून या संपूर्ण आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. महाड शहर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात आरोपींनी तब्बल २५० किलोग्रॅम वजनाची तांब्याची वायर चोरली होती. माणगाव पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात २३० किलोग्रॅम तांब्याची वायर चोरीला गेली होती. याच पाेलीस ठाण्यात दाखल दुसऱ्या गुन्ह्यात २३० किलोग्रॅम तांब्याची वायर लंपास करण्यात आली होती. पेण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ११० किलोग्रॅम तांब्याची वायर चोरली. अशी एकूण ५९० किलाे ताब्याची तार चाेरल्याची कबुली आराेपींनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT