illegal khair wood transport File Photo
रायगड

illegal khair wood transport: अवैध खैरलाकूड वाहतुकीचा पर्दाफाश; माणगावात वनविभागाची कारवाई

गोवा महामार्गावर 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव: माणगाव तालुक्यात मुंबई - गोवा महामार्गावर अवैधरित्या सोलीव खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाने धाडसी कारवाई करत सुमारे 18 लाख 69 हजार 309 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालकाविरोधात वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध खैरतोड करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास, माणगाव तालुक्यातील विघवली येथे मुंबई - गोवा महामार्गावर संशयित टाटा टेम्पोला थांबवून तपासण्यात आले. या तपासादरम्यान वाहनात खैर सोलिव लाकूड सुमारे 11.400 घनमीटर आढळून आले. त्याची किंमत सुमारे 69 हजार 309 रुपये असून आरोपी विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळून आले.

त्यानुसार संबंधित टेम्पो अंदाजे किंमत 18 लाख रुपये आणि लाकूड असा एकूण 18 लाख 69 हजार 309 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक नदीम अहमद, रा. वापी, जि. वलसाड, गुजरात याच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई रोहा उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव व रोहा सहाय्यक वनसंरक्षक पांढरकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच दक्षता पथक ठाणेचे विभागीय अधिकारी रोशन राठोड आणि वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा विकास भामरे यांच्या देखरेखी खाली, माणगाव वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या आदेशान्वये पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत इंदापूर वनपाल सुजित राजमाने, कुशेडे वनरक्षक अजिंक्य कदम तसेच वन मजूर विठ्ठल दिघे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT