Crime News Pudhari
रायगड

Crime News: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पळण्याच्या तयारीत असलेला आरोपी पतीला अटक

न्यायालयाकडून पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

बोर्ली पंचतन: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची दगडाने ठेचून हत्त्या करण्याची घटना बुधवारी दुपारी दिघी येथे घडली आहे. या घटनेत पत्नी अनिता वाघमारे या वीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून पती किरण वाघमारे याला अटक करण्यात आली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावाच्या हद्दीमध्ये नवगरे जंगल भागात आंबा बागायतीमध्ये राखणदार म्हणून काम करणाऱ्या विवाहित जोडप्यामध्ये नेहमीच वाद होत होते. पती आरोपी हा चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीला मारहाण करीत होता.

1 एप्रिल रोजी त्याने रागाच्या भरात तिला दगडाने ठेचून मारले. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याच्या पत्नीला आंबा बागायत मालकाने बोर्लीपंचतन येथील रुग्णालयात दाखल केले परंतु त्याआधीच रक्तस्राव जास्त झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर त्यानंतर आरोपी पती हा पळण्याच्या प्रयत्नात असताना दिघी सागरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.

दिघी पोर्ट असलेल्या हद्दीमध्ये जलील अहमद जैद यांच्या मालकीच्या आंबा बागायत रखवालीचे काम किरण परशुराम वाघमारे वय 25 वर्षे व त्याची पत्नी अनिता किरण वाघमारे वय 20 वर्षे (दोघेही राहणार मूळ गाव सायगाव, वावडूंगी पोस्ट शिघ्रे तालुका मुरुड, रायगड) दोघे दिघी येथे एका आंबा बागायतीमध्ये रखवालीचे काम करीत होते पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होते.

1 एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास दोघांमध्ये भांडण होऊन रागाच्या भरामध्ये पतीने पत्नीला दगडाने कानावर, गालावर, डोक्यावर ठेचले. यामध्ये पत्नी अनिता ही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. ही बातमी आंबा बागायत मालक जलील जैद यांना समजल्यावर त्यांनी तत्काळ जखमी अवस्थेत असलेल्या अनिता हिला रुग्णालयात दाखल केले परंतु काहीच उपयोग झाला नाही.

उपचारा आधीच अनिता मृत्यू पावली. यामध्ये आरोपी तिचा पती किरण हा पळण्याच्या प्रयत्नात असताना दिघी सागरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी किरण वाघमारे पोलीस कोठडीमध्ये आहे. तर ता घटनेचा अधिक तपास दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्षद शेख हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT