Khutil Ramwadi Farmer News Pudhari
रायगड

Raigad News: एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ! आजारी शेतकऱ्याच्या मदतीसाठी गाव एकवटलं, ग्रामस्थांकडून एका दिवसात शेतीची लागवड

Khutil Ramwadi: ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’चा प्रत्यय खुटील ग्रामस्थांनी करून दाखविला

पुढारी वृत्तसेवा

Khutil Ramwadi Latest News:

खाडीपट्टा (रायगड) : रघुनाथ भागवत

सध्या भात शेतीच्या लागवडीचे काम ठिकठिकाणी जोरदार सुरू आहे. पेरणी केलेल्या पिकाची उगवण प्रमाणात झाल्यामुळे भात लावणीला सध्या जोर आले असल्याचे खाडीपट्टयामध्ये पाहायला मिळत आहे.

खाडीपट्टयातील खुटील रामवाडी येथील ग्रामस्थ गणपत सुकूम हे आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्यामुळे त्यांची भात शेती हनुमानवाडी (होडबेकोंड) मुळगाव व आदिवासीवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक दिवसाचे योगदान देऊन भातशेतीची पूर्ण लागवड केली आहे.

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथाचा या ठिकाणी प्रत्यय आल्याचे पाहायला मिळत असून आजारी असल्याकारणाने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या आपल्या गावातील ग्रामस्थ शेतकरी गणपत सुकूम यांची भात शेती लावणी करून देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सर्वांनी एकत्र येत मदतीचा हात पुढे केला आहे आणि संघटित राहून एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका जो काही सहकार्याचा वाडीला लाभलेला वारसा आहे तो जतन करण्याचा ग्रामस्थांसह महिलांनी जपला असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

दुर्गम अशा दरी कपारी असणार्‍या खुटील येथील ग्रामस्थांनी नेहमीच मदतीची भूमिका निभावली आहे. सर्व सण, उत्सवामध्ये एकीचे दर्शन घडविले आहे, तर ग्रामस्थांच्या सुखदुःखात एकत्र येऊन एकीच्या बळाने सर्वांच्या सहकार्याने ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या प्रमाणे गुण्या गोविंदाने गावपण जपण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्येष्ठ ग्रामस्थांचे मार्गदर्शन, गावाची प्रथा, रूढी, परंपरा आणि गावाला लाभलेला अध्यात्मिक वारसा याचे भान ठेवून लहान सहान, तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये ऋणानुबंध जतन करण्याचे श्रेष्ठ कार्य या ठिकाणी केले जात आहे. सर्व समावेशक आणि सर्वांच्या फायद्याचे आणि तितकेच उपयुक्त असलेले विकासात्मक कामांच्या निर्णयांची पूर्तता करण्यासाठी सदैव हे गाव कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळते. एखादे घेतलेले निर्णय आणि हाती घेतलेले विकासाचे काम पूर्णत्वाला नेण्यापर्यंत ग्रामस्थ आणि महिला मंडळ पूर्ण क्षमतेने झोकून देऊन माझे गाव माझी जबाबदारी असल्याचे एकमेकाला सहाय्य करत ते पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्नशील असतात याचे उदाहरण अनेक वेळा पाहायला मिळाले.

ग्रामस्थांच्या एकीचे चित्र समोर

संघटित राहून एकमेकाला सहकार्य करणे आपल्या वाडवडिलांनी दिलेला रूढीपरंपरेचा वारसा आहे तो वारसा तेथील तरुण ग्रामस्थांसह महिला मंडळाने पुढे चालवून एकमेकांच्या मदतीला धावण्यासाठी एकीने पुढे सरसावून महिला, पुरुष एकत्र येऊन भात लावणीच्या कार्यामध्ये सहभाग घेऊन गणपत सुकूम यांच्यावर आजारपणामुळे कोसळलेल्या दुःखामध्ये त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. ग्रामस्थ सुकूम आजारी पडल्यानंतर ऍडमिट झाल्यावर त्यांच्या शेतीचे कसे होणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहताच सार्‍या ग्रामस्थांनी त्यांना काही काळजी करू नका आम्ही सर्व एकत्र येऊन तुमच्या भात शेतीची लागवड करू असा शब्द दिलाने अखेर एका दिवसामध्ये सारे ग्रामस्थ एक वटून एकीच्या बाळाने भात लावणी पूर्ण केली आहे. यामुळे ग्रामस्थांच्या एकीचे चित्र समोर येऊन त्यांच्या या आदर्शाचे कौतुक सर्वत्र होत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT