Hospital Slab Collapse Pudhari
रायगड

Hospital Slab Collapse: जिल्हा रुग्णालयात स्लॅब कोसळून रुग्ण गंभीर जखमी

प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी; रुग्णांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करा -चित्रलेखा पाटील

पुढारी वृत्तसेवा

रमेश कांबळे

अलिबाग: उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या अंगावर मंगळवारी सकाळी स्लॅब कोसळला. या अपघातामध्ये रुग्ण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर रुग्ण प्रशासनाच्या कारभाराबाबत शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी संताप व्यक्त केला. रुग्णांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड.मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, आदी उपस्थित होते.

श्रीवर्धनमधील सुनील अवरे (44) या व्यक्तीचा अपघात झाला होता. श्रीवर्धनमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. अधिक उपचारासाठी त्यांना रविवारी (30) अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

गेली दोन दिवसाच्या उपचारानंतर मंगळवारी दुपारी त्यांना सोडण्यात येणार होते. मात्र त्याच दिवशी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास सर्जिकल वार्डमध्ये निद्रावस्थेत असताना त्यांच्या डोक्यावर स्लॅब कोसळला. त्यामध्ये ते जखमी झाले.

पुन्हा कोसळला स्लॅब

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्जिकल वार्डमध्ये मंगळवारी पहाटे स्लॅब कोसळून एक रुग्ण जखमी झाला. त्यानंतर दुपारीदेखील याच भागात पुन्हा स्लॅब कोसळला. सुदैवाने त्याठिकाणी कोणीच नव्हते. त्यामुळे जिवीतहानी टळली. रुग्णालयात आतापर्यंत आठ वेळा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

स्लॅब कोसळून रुग्ण जखमी होणे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. प्रशासनाने रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभागासह रुग्ण प्रशासनही या घटनेला जबाबदार आहे.
- चित्रलेखा पाटील, प्रवक्त्या, शेकाप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT