रायगड

Heat stroke Raigad | खाडीपट्टयात वाढत्या उष्णतेचा आंब्याला फटका

आंबा बागायतदार चिंतेत; मोहर करपू लागल्याने झाडाच्या कैर्‍या करपल्या

पुढारी वृत्तसेवा

खाडीपट्टा (रायगड) : रघुनाथ भागवत

याठिकाणी काही दिवस उष्णतेची एकप्रकारे लाट पसरली असल्यासारखी परीस्थिती निर्माण झाली असून वाढत्या उष्णतेमुळे मनुष्य आणि वन्यजीव प्राण्यांवर देखील मोठा विपरीत परिणाम होत आल्याचे दिसत येत होते. मागील पाच सहा दिवसांमध्ये उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढून तो अगदी 36 ते 38 अंश सेल्सियस तापमान पर्यंत पोहचला होता. या उष्णतेच्या परिणाम आंबा बागायतीवर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रखर उष्णतेमुळे आंबा करपू लागला असून तर यामुळे आलेल्या कैर्‍या देखील काळ्या पडू लागल्या आणि कैर्‍या गळून पडण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. याप्रकारामुळे आंबा बागायतदार धास्तावला असून आंबा बागायतीचे लाखों रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे.

महाड खाडीपट्टयात उष्णतेच्या झळा वाढतच असल्याने याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसू लागला आहे. वाढत्या उष्णतेने आंब्याच्या झाडांवरील कैर्‍या गळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच कैर्‍या उन्हाने करपू लागल्याने काळ्या पडू लागल्या आहेत. याप्रकारामुळे आंबा बागायतदार धास्तावला असून यामुळे आंबा बागायतीचे लाखों रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे.

बदलत्या वातावरणामुळे दरवर्षी आंबा व्यावसायिक आर्थिक संकटात सापडतो. यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे आणि पडलेल्या थंडीमुळे आंबा पीक मुबलक प्रमाणात येण्याची आशा बागायतदारांना वाटत होती. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली.

डिसेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र मोहर आल्याच्या मानाने फळधारणा कमी झाली. असे असतानाच या वर्षी आंबा पीक उष्णतेचे शिकार बनले आहे. बागायतदार आंबा पीक वाचविण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महाडच्या खाडीपट्टयात मोठ्या प्रमाणात आंबा बागायतदार आहेत. या सर्वांनाच आंबा व्यावसायात नुकसान सहन करण्याची भीती वाटू लागली आहे. दिवसेंदिवस उष्णतेमध्ये प्रखरतेने वाढ होत असून मध्यानमध्ये पडणार्‍या तापीने आंबा बागायतीचे मोठे नुकसान पोहचत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार पुरता दुखाच्या खाईत कोसळला आहे. वारंवार लागणार्‍या वणव्यांनी देखील बागायतदारांची झोप उडवली असून त्यांच्याशी सामना करता करता नाकी नऊ येत असल्याचे आंबा बागायतदारांनी सांगितले.

मोहर येऊनही फळधारणा कमीच

डिसेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र मोहर आल्याच्या मानाने फळधारणा कमी झाली. असे असतानाच या वर्षी आंबा पीक उष्णतेचे शिकार बनले आहे. बागायतदार आंबा पीक वाचविण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT