माणगाव : माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव मारुती पवार यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ज्ञानदेव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे नेते म्हणून ओळखले जात होते. विधानसभा निवडणुकीचे लगबग सुरू झाल्यानंतर त्यांनीही शिवसेना शिंदे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय ऐन निवडणुकीत घेतला. ते शुक्रवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँ. शरद पवार गटात राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व पक्ष श्रेष्ठींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या अनेक कार्यकर्ते सहकार्यांसह प्रवेश करून हाती तुतारी घेणार आहेत. त्यामुळे माणगाव सह श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ज्ञानदेव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात त्यांच्या या पक्षप्रवेशाने महायुतीला मोठा हादरा बसणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय गणिते बिघडणार आहेत. श्री. पवार हे शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँ. पक्षात शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवस माणगाव तालुक्यात रंगल्या होत्या. अखेर सायंकाळी उशिरा खुद्द ज्ञानदेव पवार यांनी आपण आपल्या अनेक सहकारी, समर्थकांसह मुंबईत आज पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. चे अपक्ष प्रवेशाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत याकडे आता राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ज्ञानदेव पवार यांच्या शरद पवार गटात पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठी ताकद मिळणार आहे.
माणगाव हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचे असे तालुक्याचे ठिकाण असून राजकीय केंद्रबिंदू म्हणून माणगाव ओळखले जाते. या माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन 2021 मध्ये होऊन ज्ञानदेव पवार हे आपल्या वार्ड क्र.16 मधून निवडून आले होते. शिवसेना पक्षाचे ज्ञानदेव पवार यांची अडीच वर्षाकरिता दि.10 फेब्रुवारी 2022 रोजी माणगाव नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटातून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान,ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पवार हे तुतारी हाती घेणार असल्याने माणगावच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.महायुतीतही यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला नाशिक पश्चिम, नांदगाव व मालेगाव बाह्य या तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. याखेरीज नाशिक मध्य, निफाड व देवळाली या तीन अतिरीक्त जागांवर ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे. नाशिक मध्य काँग्रेसचा पारंपरीक मतदारसंघ आहे. माजी आमदार वसंत गिते यांच्यासाठी हा मतदारसंघ ठाकरे गटाला हवा आहे. निफाड मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल कदम इच्छूक आहेत. देवळाली मतदारसंघही राष्ट्रवादीकडे असताना ठाकरे गटाच्या योगेश घोलप यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.