रायगड जिल्ह्यामधील म्हसळा तालुक्यातील एका आदिवासीवाडी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची आणि गरोदर असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदरील अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याची माहिती आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीतून उघड झाली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.
संबंधित घटनेची अधिक माहिती घेतली असता तळवडे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनीषा लोंढे यांनी म्हसळा पोलिस ठाण्यात फियांद दिले वरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, घटनेत २० वर्षाच्या नवरदेव आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलगी ही केवळ साडे चौदा वर्षांची आसल्याचे सांगण्यात आले. आशा सेविकांच्या तपासणी अहवालात पीडित मुलीने तिच्या अडचणी सांगितल्यानंतर हा प्रकार आरोग्य विभागाच्या लक्षात आला. संबंधितांनी २ जून रोजी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या असल्याची चर्चा आहे. आशा सेविकेच्या माध्यमातून पीडित मुलीची तपासणी करण्यात आली असता पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची खात्री करण्यात आली. याबाबत अधिक तपास पीएसआय एस. पी. रोहिणकर हे करीत आहेत.
ऐन अधिवेशनाच्या तोंडावरच राज्याच्या महिला व बाल विकास मंत्र्यांच्या मतदारसंघातील म्हसळा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडल्याने चर्चेला उधाण आले आहे, म्हसळा तालुक्यात यापूर्वी सुद्धा पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांच्या अनेक घटना घडलेल्या असल्याने आल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर घटनेची दखल राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने घेतली पाहिजे. त्याचबरोबर तालुक्यातील महिला व बाल विकास प्रकल्प अधिका-यांनी देखील अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक जनजागृती करणे गरजेचे आहे.
अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध ठेवल्याने ती गरोदर असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत मिळाली आहे. आरोपीने नंतर तिच्याशी विवाह केला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.संदीप कहाळे,पोलिस निरीक्षक म्हसळा पोलिस ठाणे