महाड : महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांचा महाड मधील चांदे मैदानात महाड विधानसभा मतदार संघातर्फे भव्य नागरी सत्कार आणि मतदारांचे आभार असा कार्यक्रम शुक्रवारी (दि.२७) आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा सेनेचे नेते विकास गोगावले यांनी दिली. या सत्कार सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, नाम. गुलाबराव पाटील, नाम, दादा भूसे तसेच रायगड जिल्हयातील महायुतीचे सर्व आमदार आदी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
ना. भरतशेठ गोगावले यांचे पुत्र युवासेना राज्य कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपूर अधिवेशनात मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर प्रथमच महाडमध्ये आगमन झालेल्या नाम. भरतशेठ गोगावले यांचे हजारो समर्थकानी जल्लोषात स्वागत केले होते. त्याच उत्साहात हा भव्य कार्यक्रम होणार असल्याची माहीती कार्यकर्त्यांनी दिली.