जीबीएस  pudhari photo
रायगड

GBS | दूषित पाणी आणि शिळ्या अन्नामुळे 'जीबीएस'चा धोका

नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त चितळे

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पुणे व इतरत्र गुइलेन-बॅरै सिंड्रोम (जीबीएस) या नव्या दुर्मिळ आज ाराचे संशयित रुग्ण आढळून येत आहे. दूषित पाणी व शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.

गुइलेन-बॅरे सिंड्रोममध्ये या रुग्णांना तीव्र स्वरूपाचे जुलाब, ताप, अंगदुखी अशी लक्षणे सुरुवातीला निर्माण झाली आणि त्यानंतर पायामधील ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. काही रुग्णांमध्ये अल्प कालावधीमध्ये स्नायूंमधील ताकद कमी होत जाऊन श्वसनाला अडथळा निर्माण व्हायला लागल्याने कृत्रिम श्वसनासाठी त्यांना आयसीयूमध्ये अॅडमिट करावे लागते. या आजाराचा शोध फ्रेंच न्यूर ोलॉजिस्ट जॉर्ज गिलीयन आणि जीन अलेक्झेडर बॅरी आणि यांनी १९१६ साली लावला म्हणून त्यांच्या नावामुळे या आजाराचे नाव गिलियन बॅरी सिंड्रोम असे पडले. हा काही नवीन आजार नाही, भारतामध्ये या आजाराच्या केसेस आढळत असतात. या आजारामध्ये माणसाची स्वतःचीच प्रतिकारशक्ती स्वतःच्या मज्जा संस्थेवरती हल्ला चढवते. शरीरातील नसा आणि स्नायू याचे कार्य त्यामुळे बाधित होते.

या रोगाची लक्षणे लक्षात घेता पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पूर्ण शिजवलेले, ताजे अन्न खावे, रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खावू नये, गिलियन बॅरी सिंड्रोम रोगाची लक्षणे दिसू लागल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT