श्री गावदेव विरेश्वर महाराज  Pudhari News Network
रायगड

Gavdev Vireshwar Maharaj : महाडचे आराध्यदैवत जागृत श्री गावदेव विरेश्वर महाराज

पुरातन, ऐतिहासिक लाभलाय वारसा

पुढारी वृत्तसेवा

रायगड : सांस्कृतिक वारसा लाभलेल्या व क्रांतिकारक घटनांचा इतिहास सर्वदूर पसरलेल्या शहराचे ग्रामदैवत देखिल तेवढेच जागरूक श्री गावदेव विरेश्वर हे देवस्थान साक्षात्कारी व स्वयंभू असे मंदिर आहे. येथे शपथा न्याय निवाडे होत असत त्यातीलच एक निवाडा पोलादपूरचे श्री शिवछत्रपतींचे विश्वासू म्हणून मानले जाणारे रामजी चित्रे देवळेकर यांचा उकळत्या तेलात हात घालून होन बाहेर काढल्याचा आहे.

कर्नाटक प्रांतातील पाथरवटांनी साकारली कला

श्री विरेश्वराचे मंदिर व त्याजवळील मेघडंबरी यांचे काम पेशवाईच्या मध्यकाळी महाडचे वतनदार यशवंत महादेव पोतनीस यांच्या काळात झालेले आहे. या बांधकामासाठी लागणारा दगड मंदिरासमोरिल जागेतून काढला असून त्या ठिकाणी तळ्याचे काम करण्यात आले आहे. कर्नाटक प्रांतातील पाथरवटांनी आपली सारी कला जिव ओतून केलेली आजही आपणास या मूर्तीच्या निर्मितीकारांचा कथा सांगतात.

रात्रीचे शोभेचे दारूकामाचे दृश्य पहाण्यासाठी गावकऱ्यांची देवळाकडे आजही धाव

देवळात प्रवेश करते वेळी रेखीव कोरीव काम केलेला उंचीला कमी असणारा नंदी आणि मुख्य दरवाजा दगडात कोरलेला असून समपातळित आहेत. या ठिकाणी दसरा, दिवाळी, त्रिपुरी पोर्णिमा आहे. उत्सव साजरे होतात. सत्र यावेळी सारा गाव जमा होवून आनंद लुटत असे , या विविध उत्सवासाठी सरकारातून खर्चासाठी पैसा दिला जात असल्याचा नोंदी पाहावयास मिळतात. महाशिवरात्रीचे वेळी आई जाखमाता गावदेवी विरेश्वर मंदिरात प्रस्थान झाल्यावर रात्रीचे शोभेचे दारूकाम होत असे, हे रम्य दृश्य पहाण्यासाठी सारा गाव देवळाकडे आजही धाव घेतो.

श्री गावदेव विरेश्वर महाराज

शिवकाळात हे देऊळ आजचे स्वरूपात बांधलेले नव्हते त्यावेळी महाड शहराची वस्ती हल्लीचे कोट भागात होती आणि त्याचे आजूबाजूचा भाग पूर्ण जंगलमय होता त्या काळी विरेश्वर ची स्वयंभू पिंड ही एका जाळीत वसलेली होती तेथे लोक जाऊन त्याची भक्ती व पूजा करीत शिवकाळात या देवस्थान वर देऊल बांधले गेले नाही कारण तेव्हा या महाड पोलादपूर भागवर जंजिरेकर सिद्दी व विजापूरकर याच्या नेहमीच स्वार्‍या होत या मुळे देऊळ बांधले तर देवळात हानी पोचेल या समजुतीने देवळाची रचना झाली नसावी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सन 1674 -75 राज्यभिषेक नंतर या पिंडी पुढे एक दिव्य झाल्याची घटना बखरीत आहे. हे दिव्य शिवाजीराजे समक्ष झाले. रामजी चित्रे देवळेकर यांनी छत्रपती चे 36 मण सोन्याचे सिंहासन पाचाड येथे कारागीर सोनारकडून घडवून घेतलय त्या वेळी चित्र्यांनी काही सोन्याचा अपहार केला असावा असा लोक प्रवाद प्रचलित झाला चित्र्याची या लोक प्रवादातून सुटका व्हावी म्हणून शिवाजी महाराज यांनी दिव्य घडवून आणले उकळत्या तेलात हात घालून आत टाकलेला होन चित्र्यांनी उघड्या हातानी बाहेर काढला व त्या मुळे ते दोष मुक्त ठरले हे दिव्य श्री विरेश्वराला साक्ष ठेवून त्याचे समोर घडले असा इतिहास आहे.

शिवरात्रीचे दुसरे दिवशी श्री विरेश्वराची महापूजा बांधून दुपार महानैवेद्य अर्पिला जातो त्या वेळी गाभार्‍याची सर्व दारे बंद करून आत कोणालाही जाता येत नाहै काही वेळाने सर्वसक्षम दरवाजा उघडतात तेव्हा देवापुढे नैवेद्याचे भातावर पंजा उठलेला अगर लाडू फुटलेला आढळून येतो हा चमत्कार आजही पाहणेस मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT