रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा गावठी वालाचे पिक शेतशिवारात आता बहरु लागले आहे. दीड-दोन महिन्यात गावठी वालाच्या शेंगा खवय्यास मिळणार आहेत. सध्या शेतकरी येथील शेतकरी वालाच्या पिकाची काळजी घेताना दिसत आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये ओढ लागते ती वालाच्या शेंगांच्या पोपटी पार्टी ची. त्यासाठी पावसाळा संपल्यानंतर दिवाळी च्या दरम्यान वालाचे पीक घेणारे शेतकरी वर्ग शेतीची नांगरकी मशागत करून वालची पेरणी करून त्याची देखभाल सुरू होते. सध्या परिस्थितीत दोन महिन्यानंतर वालाच्या शेंगा देणारे रोपटे बहरू लागल्याने आता पोपटी खवय्यांना वेध लागलेत ते वालाच्या शेंगांचे दोन दिवसांवर जुन्या वर्षला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताला पोपटी पार्टी ची जोड असते मात्र आता पावट्याच्या शेंगावर खवय्ये पोपटी पार्टी ची तहान भागविली जाणार हे मात्र नक्कीच. खालापूर तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात वालाच्या शेंगांची पोपटी पार्टी ही खवय्यांना जणू काही मोठी पर्वणीच असते. वालाच्या शेंगा तयार झाल्यानंतर सुरवातीला चढ्या भावाने विक्री होत असली तरी पोपटी पार्टी ची हाऊस भागविण्यासाठी मिळेल त्या भावाने शेंगा खरेदी केल्या जातात. या वालाच्या शेंगा तयार व्हायला अजून एक ते दीड महिना म्हणजे फेब्रुवारी च्या शेवंटीच्या दरम्यान येत असतात. त्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या दरम्यान पाऊस थांबला की वाल पेरणीसाठी शेतीची मशागत केली जाते आणि वाल पेरणी करून गुराढोरा पासून बचाव करण्यासाठी शेतील कुंपण घातले जाते. त्याच बरोबर वेगवेगळ्या भाज्याही पिकविण्यासाठी रोपटे लावले जातात आणि देखभाल करताना रात्रंदिवस शेतकरी राबत असतो. अजून किमान दिड महिना तरी शेंगाची वाढ होण्यास कालावधी लागणर आहे आणि त्यांनंतर वालाच्या शेंगांचे रोपटे शेंगांचे पीक देण्यास सुरुवात होईल असा अंदाज वालची शेती लावणारे शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आता नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी पोपटी शौकिन खवय्ये आता पोपटी ची तहान भागविण्यासाठी पावट्यांचा शेंगांचा आधार घेऊन पोपटी पार्टीची तहान भागविणार यात शंका नाही.
दिवाळी दरम्यान पाऊस थांबला की वालाच्या शेंगांचे पीक घेण्यासाठी शेतीची नांगरकी व मशागत करून वालची पेरणी करून संपूर्ण शेतीला सुरक्षेसाठी कुंपण घालून दिवस रात्र राखणी करीत असतो. यासाठी धुक्याची गरज असते मात्र सध्या परिस्थितीत ऋतू मध्ये कधीही बदल होत असल्याने अनेक केला यावर मात करून रोपांची काळजी घ्यावी लागते आणि वातावरणात बदल झाला की काळजी लागून राहते मात्र प्रत्येक वर्षाला किमान आठ ते दहा मण वालचे पीक घेता येते व या काळात वालाच्या शेंगांची पार्टीची पर्वणी मिळते.मयूर मंगेश धुमाळ, शेतकरी, धामणी