Savroli-Kharpada road  Gas cylinder truck accident
सावरोली खारपाडा रस्त्यावर पौध गावाजवळ इंडस्ट्रियल गॅस सिलिंडर भरलेला टँकर उलटला.  Pudhari News Network
रायगड

Raigad accident : सावरोली - खारपाडा मार्गावर गॅस सिलिंडरचा ट्रक उलटला

पुढारी वृत्तसेवा

रायगड : पुढारी वृत्तसेवा : सावरोली खारपाडा रस्त्यावर पौध गावाजवळ इंडस्ट्रियल गॅस सिलिंडर भरलेला टँकर उलटला. ही घटना आज (दि.२२) सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. गॅस लिक होण्याची शक्यता लक्षात घेता औद्योगिक आपत्ती निवारण तज्ज्ञ धनंजय गीध, विजय भोसले आणि सौरभ घरत घटनास्थळी दाखल झाले आहेत. लिकेज असलेले सिलिंडर मॅन्युअली बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.                   

अग्निशमन टीम घटनास्थळी दाखल

दरम्यान,  टाटा स्टीलसह काही कंपन्यांची अग्निशमन टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा, फायर टेंडर आणि ॲम्बुलन्स देखील या ठिकाणी सज्ज आहेत. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अलकाईल अमाईन्स या कंपनीतील तज्ज्ञ देखील त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी पोहोचत आहेत.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने  गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या  गाडीच्या मालकाशी संपर्क केला असून ते गुजरात येथून तातडीने निघाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

SCROLL FOR NEXT