Black Magic sexual exploitation case | खरातनंतर आता खालापूरचा ‘बाबाजान’; जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार; विकृत कांड करणारा भोंदू अटकेत 
रायगड

Black Magic sexual exploitation case | खरातनंतर आता खालापूरचा ‘बाबाजान’; जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार; विकृत कांड करणारा भोंदू अटकेत

पुढारी वृत्तसेवा

खोपोली : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभर खळबळ उडालेली असतानाच रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातही असाच प्रकार समोर आला आहे. जादूटोणा आणि अघोरी विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या भोंदूला पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजान (रा. कळंबोली, नवी मुंबई) असे त्याचे नाव आहे.

या प्रकरणी सांताक्रूझ (मुंबई) येथील पीडित महिलेने खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेतला. पतीच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्येवर उपाय करण्यासाठी ती संबंधित भोंदूकडे गेली होती. मात्र, उपाय करण्याच्या बहाण्याने आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. खालापूर तालुक्यातील महड परिसरातील एका निर्जन फार्महाऊसवर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीविरोधात बलात्कार, फसवणूक आणि धमकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काळ्या जादूची भीती दाखवून अत्याचार

बाबाजान हा लोकांना तत्त्वज्ञान सांगायचा. अल्लाचे महत्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करायचा. गोड बोलून आल्लातालाचे गारूड करून भक्तांना आपलस करीत होता. त्याच्या सानिध्यात येणार्‍यांना वश करायचा तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून महिलांना आपलंस करायचा.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ आरोपीच्या विरोधात आक्रमक

भोंदूबाबा अब्दूर रशिद ऊर्फ बाबाजान याने अत्याचार केलेल्या महिलांना पाठिंबा देत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास प्रोत्साहित करण्याचे काम मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केले आहे. सर्व धर्मांमध्ये भोंदू ही लागलेली कीड असल्याचा आरोप मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केलाय. अशा भोंदूंना सर्वच पक्षांनी राजकीय सहारा न देण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT