रायगड: जगभरात एल निनोची स्थिती तयार झाली असून त्याचा परिणाम मान्सूनवर होणार आहे. एल निनोचा कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार असून यंदा खरिपातील लागवडीखालील क्षेत्रामध्ये आणि उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
राज्यात सात जूनपासून मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे मेपासून खरिपाच्या हंगामाची तयारी सुरु होते. पूर्वी हवामान मोठा फरक पडत नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे वेळपत्रक ठरलेले होते.
मात्र मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात चढउतार होते आहेत. गेल्या वर्षी रायगड जिलह्यात मे महिन्याच्या पहिला आठवड्यापासून पाऊस सुरु झाला. हा पाऊस सुमारे सहा महिलाने होता. याचा परिणाम कृषीवर झाला आहे.यंदा देशभरात कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला असून यासोबत एल निनोचाही परिणाम यंदाच्या
मान्सूनवर होणार आहे. कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार असून यंदा खरिपातील लागवडीखालील क्षेत्रामध्ये आणि उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये.
दरम्यान, यंदा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील तापमान जास्त असल्यामुळे जगभरात एल निनोची स्थिती तयार झाली आहे. या हवामानातील बदलाचा भारतीय मान्सूनवर परिणाम होणार असून यामुळेच यंदा पाऊस कमी पडणार आहे. मान्सूनच्या चारही महिन्यात एल निनोचा प्रभाव असून जूनपासून सप्टेबरपर्यंत हा प्रभाव वाढत जाईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे देशभरातील जवळपास सर्वच भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असून यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी खरिप हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करणे, उन्हाळ्यातच पाणी साठवणूक करण्यासाठी भूजल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपाय करावेत अशा सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आल्या आहेत. यासोबतच मान्सून दाखल होताच शेतकरी पेरण्यांसाठी आणि लागवडीसाठी घाई करतात, पण यंदा पेरण्यांची घाई न करता योग्य प्रमाणात ओलावा आणि पुढील पावसाचे प्रमाण बघूनच पेरणी करावी अशा सूचनाही हवामान विभागाने दिल्या आहेत.
पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे
एल निनोच्या प्रभावामुळे देशभरातील जवळपास सर्वच भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असून यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी खरिप हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करणे, उन्हाळ्यातच पाणी साठवणूक करण्यासाठी भूजल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपाय करावेत अशा सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आल्या आहेत.