Kashedi Ghat Tempo Overturns  Pudhari
रायगड

Kashedi Ghat Accident | कशेडी घाटात टेम्पो लोखंडी बॅरिकेट्सवर आदळून रस्त्यावर उलटला

Raigad News | कशेडी घाटातील धामणदेवी गावाजवळील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले

पुढारी वृत्तसेवा

Kashedi Ghat Tempo Overturns

पोलादपूर : मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी घाटात धामणदेवी गावाच्या हद्दीत गोव्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो अपघातग्रस्त होऊन उलटला. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चालक जगदीश लल्लम गौतम (वय ३५) हा एमएच ४८ डीसी २७९४ क्रमांकाचा आयशर टेम्पो घेऊन वसईहून गोव्याकडे जात होता. कशेडी घाटातील धामणदेवी गावाजवळील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो लोखंडी बॅरिकेट्सवर आदळून रस्त्यावर उलटला.

अपघातात टेम्पोमधील काही फर्निचर साहित्य रस्त्यावर पडले असून वाहन उलटल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील बॅरिकेट्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस आणि पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाणे अंमलदार सतीश कदम हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT