तळोजात 25 लाखांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक  
रायगड

Taloja Drugs Seized | तळोजात 25 लाखांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने तळोजा परिसरातील एकटपाडा येथील एका इमारतीमध्ये धाड घालून मंगळवारी दुपारी 25 लाखांचा अंमली पदार्थाचा साठ्यासह तीघांना अटक केली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश धुमाळ, श्रीकांत नायडु यांच्या पथकाला तळोजातील एका इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश काळदाते यांच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करण्यासाठी एकटपाडा परिसरातील आय.जी. रेसीडेन्सी या इमारतीमध्ये सदनिका क्रमांक 206 मध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता पोलीसांनी धाड घातली. यावेळी 1 नायजेरीयन व्यक्तीसह 2 पनवेलच्या 2 व्यक्तींना अंमली पदार्थासह ताब्यात घेतले. या धाडसत्रात पोलीसांना सव्वालाख रुपयांची मेफेड्रॉन पावडरसह, 21 लाखांचे कोकेन असे 127 ग्रॅम अंमलीपदार्थ सापडले. या टोळीच्या सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT