अलिबागमध्ये नालेसफाईला येतोय वेग  pudhari photo
रायगड

Alibag Drain Cleaning : अलिबागमध्ये नालेसफाईला येतोय वेग

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका यंत्रणा सतर्क

पुढारी वृत्तसेवा

अलिबागः अलिबाग नगर परिषदेमार्फत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई आणि गटारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे पावसाळ्यात शहरातील सांडपाणी तुंबून पूरस्थिती उदभवू नये साथींच्या आजारांचा प्रदर्भाव टाळता यावा यासाठी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्यात येते. अलिबाग शहरातील नाले सफाई 70 ते 75 टक्के झाली असून उर्वरित सफाई मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी सांगितले .

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अलिबाग शहरात नालेसफाई केली जाते. ह्यसाठी कंत्राटदारांकडून 15 ते 20 माणसं नेमली जातात. नगरपरिषदेच्या स्वनिधीतून हे काम करण्यात येत असल्याचे साळूंखे ह्यांनी सांगितले. साधारणपणे 15 ते 20 लाखापर्यंत खर्च अपेक्षित असतो.

शहरातील विविध भागांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि झाडाझुडपांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नाले, गटारे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांची साफसफाई करण्यात येत आहे. गराध्यक्ष अक्षया नाईक ,माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत शहरातील विविध भागांमध्ये नालेसफाईची कामे सुरू केली आहेत.

नागरिकांनी देखील शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, नाल्यांमध्ये कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या नालेसफाईमुळे आगामी पावसाळ्यात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT