उरण (रायगड): दिवाळी सणाची लगबग सुरू होताच उरण शहरात नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. या दरम्यान, उरण कोटनाका, चारफाटा, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका, गणपती चौक, चौक, वैष्णवी हॉस्पिटल, कामठा इत्यादी ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्री भलेमोठे असणारे रस्ते दिवसा मात्र अरुंद ठरत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.
जिल्ह्यात सर्वत्र दिवाळी सण जोरात साजरा होत असून त्या निमित्त खरेदीचा ओघ देखील वाढला आहे. या दरम्यान तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी उरण शहरात येतात. परंतु, शहरात योग्य वाहनतळ नसल्याने चारचाकी वाहनचालक रस्त्याच्या कडेला मिळेल तिथे आपल्या गाड्याा उभ्या करतात. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने पादचाऱ्यासह वाहनचालकांना मार्ग काढताना तारे वरची कसरत करावी लागते. त्यात भर म्हणजे दुकानदारांची रस्त्यावरची मक्तेदारी आणि हातगाड्यांचा सुळस ळाट यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते.
काही ठिकाणी भर रस्त्यावर दुकानदारांनी कमानी उभारून आपले सामान ठेवले आहे, त्यामुळे रस्ते आणखी अरुंद बनले आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी अधिक तीव्र होत असून, पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे रिक्षाचालकांचा बेभरवशाचा वावर, तसेच अतिक्रमणयुक्त पसारा वाहतूक कोंडीला खतपाणी घालत आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतरही नगरपालिका आणि पोलीस प्रशासन कानाडोळा करताना दिसत आहे. उलट नगरपालिका कर्मचारी पावती फाडून वसुली करण्यात व्यस्त आहेत. परंतु, या पावत्या खऱ्या की खोट्याा, याबाबत कोणीच उत्तर देत नाही. तसेच, पादचारी मार्गांवर चहाचे ठेले, दुचाकी दुरुस्ती दुकाने व छोटे स्टॉल्स यामुळे अतिक्रमणविरोधी पथकाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मासळी बाजाराचा