पोलादपूर ः रस्ता रुंदीकरण साठी डोंगर रांगा पोखरण्यात आल्याने जुलै च्या नैसर्गिक आपत्ती काळात मातीचे ढीग रस्त्यावर कोसळले होते. मात्र तत्काळ बाजूला करण्यात आले मात्र 15 ऑगस्ट पर्यंत सदरचा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्याची जिल्हाप्रसासनं या सूचनाचा पुनर्विचार करावा अशी मागणी प्रवासी वर्ग कडून करण्यात येत आहे. जुलै पेक्षा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे रक्षाबंधन गोपाळकाला गणपती उत्सव जवळ आल्याने सदरचा मार्ग खुला करावा अशी मागणी पुढे येत आहे.
पोलादपूर येथे मुंबई ते पणजी राष्ट्रीय महामार्ग क्र.17 वर शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती अश्वारूढपुतळया पासून मुंबईहून येणार्या प्रवासी व पर्यटकांना राष्ट्रीय महामार्ग कोकणात तर दुसरा राज्यमार्ग महाबळेश्वर, वाई, सातार्यापर्यंत घेऊन जातो. महाबळेश्वर गिरिस्थान थंड हवेचे ठिकाण पाहण्यासाठी जाणार्या पर्यटकांची तसेच सातारा, वाई, कराड, कोल्हापूरपर्यंत जाणार्या प्रवाशांची वाहतूक आंबेनळी घाटात मोठया प्रमाणात होते. हा संपूर्ण घाटरस्ता दूर्गम आणि त्याभोवतीच्या दर्या खूपच खोल आहेत डोगर ची माती कमी केल्याने बरयापैकी रुंदीकरण झाले होते. मात्र 2021 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये या मार्गाचे होत्याचे नव्हते झाले होते.
अनेक ठिकाणी हा मार्ग बाधित झाला होता यानंतर काही प्रमाणात दुरुस्ती करत दोन्ही वाहने सुलभपणे मार्गस्त होत होती मात्र 2025 च्या पावसाळी हंगामात मे महिन्यात पासून या मार्गावर लहान मोठी झाड पडण्याच्या घटनेला सुरवात झाली आणि जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात दरड खाली आल्याने सदरचा मार्ग 15 ऑगस्ट 25 पर्यत अवजड वाहनांना बंद करण्यात आला होता. मात्र सद्य स्थितीत सणासुदीचा हंगाम लक्षात घेता या मार्गवरीन एसटी सेवा पूर्वत करावी जने करून या मार्गवरील प्रवासी वर्गाला हक्काचे प्रवासी साधन उपलब्ध होईल त्याच प्रमाणे या मार्ग वरील लहान हॉटेल धारकांना व्यवसायाला चालना मिळते.
या मार्गवर अवजड वाहतूकीसह पोलादपूर वाई पुणे, महाड अक्कलकोट, रोहा कोल्हापूर, रोहा तुळजापूर, रोहा सांगली, पिंपरी चिंचवड महाबळेश्वर पोलादपूर मार्गे गणपतीपुळे, श्रीवर्धन मिरज, सातारा, आदीसह पाचगणी मुंबई, बोरिवली, महाबळेश्वर मुंबई, आदीसह नालासोपारा बसेस पूर्वत झाल्यास वाडा येथील हॉटेल व्यवसाई यांना तेजी येणार आहे. त्याचप्रमाने या मार्गवरील अनेक गावातील नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
उपाययोजना करणे गरजेचे
पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरुर राज्यमार्ग एसटी वाहतूक बंद असल्याने सातारा किंवा इतर ठिकाणी जाण्यास लांबचा प्रवास करावा लागत आहे. प्रशासन रस्ता बंद राहणार नाही. यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. सणासुदीला अनेक प्रवासी किंवा व्यापारी या मार्गावरून प्रवास करत असतात त्यांच्या सेवेसाठी हा मार्ग खुला करावा अशी मागणी प्रवासी व्यापारी अभिषेक रावल यांनी बोलताना केली आहे. सातारामधील मेढासह वाई-महाबळेश्वरला सातत्याने जावे लागत असल्याने प्रवासी वर्गाचे मुख्य साधन असलेली एसटी या मार्गवरून पूर्वत करावी, जेणे करून वेळसह पैसेची बचत होणार आहे.