fishing  
रायगड

Nationwide Fishing Ban Law- देशभरात मासेमारी बंदीचा समान कायदा करा

मच्छीमार, मच्छीमार संघटनांची सरकारकडे मागणी, व्यवसायावर होतोय मोठा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

कोप्रोली उरण: पंकज ठाकूर महाराष्ट्रातील जलाधिक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदीच्या काळातही गोवा, केरळ, कर्नाट-कातील मच्छीमार बोटी मोठ्या प्रमाणावर मासेमारी करुन जातात त्यांना अटकाव करण्यासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे कोणतीही यंत्रणा नाही. मग मत्स्य उत्पादन वाढीसाठी शासनाच्या पावसाळी मासेमारी बंदीचा उपयोगच काय. यासाठी देशभरातील राज्यातील मच्छीमारांसाठी पावसाळी मासेमारी बंदीचा एकच कायदा करण्यात यावा अशी मागणी संतप्त मच्छीमार आणि मच्छीमार संघटनां-कडून केली जात आहे.

महाराष्ट्र शासनाने मासळीचे उत्पादन वाढीसाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधीत ६६ दिवसांवरुन १५ ऑगस्टपर्यंत म्हणजेच ७५ दिवसांपर्यंत वाढवला आहे.या ७५ दिवसांच्या मासेमारी बंदीच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलाधिक्षेत्रातील १२ नॉटिकल सागरी मैलाच्या आत मासेमारी करतात येणार नाही. तसा अध्यादेशही शासनाने जारी केला आहे. तसेच या बंदी कालावधीत राज्याच्या सागरी जलाधिक्षेत्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

तसेच पावसाळी बंदी काळात परराज्यातील मच्छीमार बोर्टीवर कारवाई करण्यासाठी असलेल्या शासनाकडील पाचही गस्ती नौका किनाऱ्यावर विसावलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील बंदी काळातच उरणमध्ये सुरू असलेल्या बेकायदा मच्छीमारांवर कोणतीही कारवाई न करणारे शासन राज्यातील जलाधिक्षेत्रात परराज्यातील मच्छीमार बोटींवर कारवाई कशी व कधी करणार सवालही किरण कोळी यांनी शासनाला विचारला आहे. यासाठी देशभरातल्या राज्यातील मच्छीमारांसाठी एकच समान कायदा लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे किरण कोळी यांचे म्हणणे आहे.

माशांचे उत्पादन वाढीसाठी मासेमारी करणाऱ्या वेस्ट व ईस्ट कोस्ट सागरी क्षेत्रातील सर्वच राज्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा एकच समान कायदा असावा अशी मागणी वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशरमेन्स वेल्फेअर असोसिए-शनचे संचालक रमेश नाखवा यांनीही शासनाकडे केली आहे.

परराज्यातील मच्छीमारांची घुसखोरी मात्र महाराष्ट्र सरकारने मत्स्य उत्पादन वाढीसाठी मासेमारी बंदीचा कालावधी जरी १५ ऑगस्टपर्यंत वाढविला असला तरी गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यातील मासेमारीचा हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या परराज्यातील बोटी राज्यातील जलाधिक्षेत्रात घुसखोरी करून मोठ्या प्रमाणावर मासेमारी करतात त्यामुळे मत्स्य उत्पादन वाढीसाठी मासेमारी बंदी निरर्थक ठरण्याची भीती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी यांनी माहिती देताना व्यक्त केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT