रायगडच्या शिवारात नागली नाचणीचा बाज वाढतोय pudhari photo
रायगड

Raigad farming news : रायगडच्या शिवारात नागली नाचणीचा बाज वाढतोय

लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ, दापोली 1 बियाण्याला पसंती

पुढारी वृत्तसेवा

सुधागड ः संतोष उतेकर

जिल्ह्यात एकेकाळी भातानंतर मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे नागली नाचणी पीक पुन्हा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरू लागले आहे मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी असल्याने मागील दोन दशका ंत या पिकाचे क्षेत्र घटले होते मात्र 20 28 नंतर साकस आहार म्हणून नागलीला म्हणजेच नाचणीला वाढती मागणी मिळून लागल्याने आणि कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे या पिकाच्या लागवडीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात सुमारे 2 हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर नाचणीचे लागवड होणार असून हे क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 12 टक्क्यांनी अधिक आहे भात पेरणी पूर्ण झाल्यानंतर सध्या जिल्ह्यात विविध भागात नाचणी पेरणी ची कामे पूर्ण झाली आहेत.

सह्याद्री पर्वता रांगातील जास्त पावसाच्या प्रदेशात पारंपारिक पद्धतीने घेतले जाणारे हे पीक शेती परवडत नसल्याने कमी झाले होते त्यातच डोंगराला भागात आंबा आणि काजू लागवड वाढल्याने नाचणीचे क्षेत्र घटले होते मात्र सुधारित बियाणे आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे शेतकरी पुन्हा या पिकांकडे वळत आहेत.

प्रति हेक्टर उत्पादनात वाढ 20 28 व 19 मध्ये नाचणीचे उत्पादकाला 992 किलो प्रति हेक्टर प्राप्त झाली होती ती सरासरी उत्पादनाच्या तुलनेतील 175 किलो प्रति हेक्टर आर्थिक असल्याचे निश्चित झाले आहे ती आता 11 43 किलो प्रति हेक्टर इतकी झाली आहे कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शनानंतर यात अधिकाधिक भर पडत असल्याचे दिसत आहे नाचणी पिकाला बाजारपेठेत मागणी होत असल्याने ही उत्पादकता वाढवण्यासाठी निवडक बियाण्यांचा वाटप शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून केला जाणार आहे.

कोट केंद्र शासनाने नाचणी बाजरी हे सकल धान्य म्हणून जाहीर करत त्यांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे रायगडामध्ये पारंपारिक पद्धतीने नातीचे उत्पादन घेतले जात आहे मात्र अलीकडे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे बाजारात मागणी नसल्याचे मुख्य कारण होत साखर म्हणून केलेल्या जनजागृती मध्ये ही मागणी वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT