Dam overflow in Raigad district
रायगड जिल्ह्यातील धरणे ओव्हर फ्लो Pudhari Photo
रायगड

Raigad Dam | रायगड जिल्ह्यातील धरणे ओव्हर फ्लो

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सुरु होऊन एक महिना होत आला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे रायगड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील 28 धरणांपैकी 7 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. तर सहा धरणांमध्ये अद्यापही वीस टक्केपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

100 टक्के भरलेली धरणे - रोहा- सुतारवाडी, सुधागड- उन्हेरे, म्हसळा- पाभरे, संदेरी, महाड- खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे.

20 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेली धरणांमध्ये मुरुड- फणसाड, अलिबाग- श्रीगाव, सुधागड- ढोकशेत, श्रीवर्धन- रानीवली, कर्जत- साळोख, अवसरे यांचा समावेश होतो.

रायगड जिल्हयात गेल्या महिनाभरात झालेल्या पावसाने जून महिन्याची सरासरी पार केलेली नाही. त्यामुळे जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जून महिन्याच्या सरासरीच्या 77 टक्केच पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातही पावसाचे वातावरण बदलले नाही. जोरदार पावसाचा अभाव यामुळे जिल्हयातील धरण आणि तलावांतील पाणी साठ्यावर परिणाम होत आहे. रायगड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित मुरुड तालुक्यात फणसाड धरणाची पूर्ण पाणी संचय पातळी 122 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 111.20 मीटर आहे. तळा तालुक्यातील वावा धरणाची पूर्ण संचय पातळी 116 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 114 मीटर आहे. रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरणाची पूर्ण संचय पातळी 93 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 93.19 मीटर आहे. पेण तालुक्यातील आंबेघर धरणाची पूर्ण संचय पातळी 102 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 99.08 मीटर आहे. अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरणाची पूर्ण संचय पातळी 87.80 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 72.60 मीटर आहे.

धरणांतील टक्केवारी

फणसाड - 11, वावा - 12, सुतारवाडी - 100,

आंबेघर - 68, श्रीगाव- 2, कोंडगाव - 43, घोटवडे- 21, ढोकशेत- 5, कवेळे - 31, उन्हेरे - 100, कार्ले- 44,

कुडकी- 63, रानीवली - 19, पाभरे - 100, संदेरी - 100, वरंध - 65, खिंडवाडी - 100, कोथुर्डे - 100, खैरे - 100, साळोख - 16, अवसरे - 11, भिलवले - 96, लोते-मोकाशी - 35, डोणवत - 34, मोरबे - 41, बोमणोली - 46, उसरण- 64, पुनाडे - 26.

SCROLL FOR NEXT