स्कुटी-कारच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू  pudhari photo
रायगड

Road accident : स्कुटी-कारच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

कारचालकाविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : नेरळ कळंब या राज्य मार्गावर स्कुटी व कारच्या झालेल्या भीषण अपघातात वृद्ध दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनोद पिल्लई आणि सुषमा विनोद पिल्लई अशी त्यांची नावे आहेत.

पिल्लई दाम्पत्य हे नेरळच्या दिशेने स्कुटीवरून येत होते. त्याचवेळी नेरळहून कळंबच्या दिशेने भरधाव निघालेला कारचालक संस्कार अंजने हा ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्‍या स्कुटीला विरुद्ध दिशेने धडक दिली. या झालेल्या अपघातात वृद्ध दांपत्य हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी नेरळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.

कार चालक संस्कार अंजने हा मित्राची कार घेऊन चार पर्यटकांना भाडे म्हणून भीमाशंकर फिरण्यासाठी नेरळ येथे आला होत. पर्यटकांना घेऊन चालक हा नेरळ येथून कळंब या राज्यमार्गावरून पुढे भरधाव वेगात निघाला होता. या दरम्यान वरई येथे या कारचालकाने पुढे चाललेल्या डंपरला ओव्हरटेक केले. त्याचवेळी समोरून स्कुटी वरून येणार्‍या दाम्पत्याला समोरून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की यामध्ये स्कुटी चालक विनोद पिल्लई (वय 62) आणि पत्नी सुषमा पिल्लई (वय 56) हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी येथे एकाच गर्दी केली. मदतीसाठी स्थानिकांनी वाहन थांबण्यासाठी प्रयत्न देखील केले परंतू कोणी मदतीसाठी थांबत नाही. गावातील एका तरुणाने स्वतः आपले वाहनामधून या जखमी दांपत्याला नेरळ मधील नेरळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

सदर घटनेची माहिती ही नेरळ पोलीस ठाण्याला मिळताच नेरळ आणि कळंब पोलिसांना घटनास्थळी दाखल झाले. मात्र नेरळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही कर्जत वॉटर सोसायटी, मानकिवली, कर्जत येथील राहत असल्याचे समोर आले आहे. अपघाताला कारणीभूत असलेला कारचालक संस्कार मुकेश अंजने याच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास उपनिरिक्षक नितिन मंडलिक हे करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT