अभिषेक सावडेकर pudhari photo
रायगड

Misconduct at office party : कंपनीच्या पार्टींकरिता आले अन् दारूच्या नशेत केला अतिप्रसंग

कोपरखैरणे येथील तरुणावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा
अलिबाग : रमेश कांबळे

मुंबईतून पार्टीसाठी आलेल्या एका महिलेवर मद्याच्या नशेत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी अभिषेक सावडेकर ( वय-25 वर्षे, रा. कोपरखैरणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे) याच्याविरोधात पीडित महिलेेने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील एका कंपनीचे काही अधिकारी-कर्मचारी असे चौदा जणांचा समुह 30 जून 2025 रोजी ऑफिस पार्टी असल्याने चौदा जणांचा समुह सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास भाऊचा धक्का येथून बोटीने मांडवा येथे आले. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे असणार्‍या अलास्का व्हिला येथे सर्वजण पोहचले. त्यावेळी पीडित महिलेच्या ऑफिसमधील अधिकारी-कर्मचारी यांची पार्टी सुरू होती. त्यावेळी सर्वजण मद्यपान करीत होते. महिना अखेर असल्याने पीडित महिलेच्या बॉसने ऑफिसमधील कर्मचारी यांच्या पगार बिलाचे काम करण्यास सांगितले आणि काम पूर्ण झाल्यानंतर पार्टीमध्ये सहभागी होण्याची सूचना दिली.

पीडित महिलेने रात्री साडे आठ वाजता पगार बिलाचे काम संपवून इतर सहकारी यांच्या सोबत पार्टीमध्ये सहभागी झाली. सदर पार्टीमध्ये पीडित महिलेने सहकारी यांच्यासमवेत मद्यपान केले. मद्यपान जास्त झाल्याने पीडित महिला ही व्हिलामधे असणार्‍या जलतरण तलाव नजिक झोपली. त्यानंतर पीडित महिलेस तेथुन तिच्या सहका-यांनी उचलुन बेडरूममध्ये नेवुन झोपवले.

1 जुलै 2025 रोजी पहाटे तीन ते साडे तीनच्या वाजण्याचा दरम्यान पीडित महिलेस आपल्यावर कोणीतरी जबरदस्ती करीत असल्याची जाणीव झाल्याने पीडित महिलेस जाग आल्याने तिने पाहिले. त्यावेळी पीडित महिलेच्या कंपनीमध्ये कंपनीचा सेल्स एक्झकेटिव्ह या पदावर काम करणारा अभिषेक सावडेकर हा रूममधुन बाहेर जाताना दिसला.

त्यावेळी पीडित महिलेच्या लक्षात आले की, अभिषेक सावडेकर याने पीडित ती दारूच्या नशेत असल्याने त्याचा गैरफायदा घेत तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवल..त्यानंतर पीडित महीला आरोपी अभिषेक याच्याकडे चौकशी करणेकरिता गेले असता त्याने त्याचा रूम बंद करून झोपला होता.

सकाळी तो उठल्यानंतर चौकशी केली असता त्याने घाबरून जावुन पीडित महिलेची माफी मागितली.याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सपोनि सरिता मुसळे या करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT