संभाजीराजे छत्रपती. (Pudhari File Photo)
रायगड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत वाघ्या कुत्र्याने उडी मारली नव्हती !

chhatrapati shivaji maharaj | संभाजीराजे छत्रपती

पुढारी वृत्तसेवा

महाड : किल्ले रायगड वरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्यात यावी या बाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहले आहे. समधीस्थळी कोणतेही अतिक्रमण नको असे सांगत वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चितेत उडी मारली नसल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला. देशातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासत त्यांचे गुण आत्मसात करावे असे आवाहनही संभाजीराजे यांनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त केले.

किल्ले रायगड वर गुरुवारी संभाजीराजे आले होते त्यांनी गडाची पाहणी केली. किल्ले रायगडाचे सौदय जपावे असे आवाहन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केले असल्याचे त्‍यांनी सांगितले. प्राधिकरण निहाय जी कामे सुरू आहेत ती दर्जेदार कशी होतील याबाबत राजेंनी सूचना केल्या. किल्ले रायगडावर अनेक कामे पूर्ण करायची असल्याचे सांगत ती लवकरात लवकर पूर्ण केली जातील अशी ग्वाही दिली.

किल्ले रायगड वरील छत्रपती शिवाजी महाराज समाधी स्थळी कोणतेही अतिक्रमण नसावे. वाघ्या कुत्र्याचा खरा इतिहास नागरिकांना समजावा म्हणून ही समाधी हलविणे गरजेचे बनले आहे. या पूर्वी सुद्धा 1947 रोजी राज्य शासन मार्फत खोब्रागडे याच्या अध्यक्षतेखाली समाधी बाबत समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी त्‍यांनीसुद्धा कुत्र्याचा कोणताही इतिहास नसल्याचे सांगितले होते.

वाघ्या कुत्रा ही दंतकथा असून याचा प्रचार ‘राजसंन्यास’ या नाटकमुळे झाला आहे. राज्यातील उजव्या-डाव्या विचारसरणी मधील सुद्धा इतिहास कार यांनी वाघ्या कुत्र्याच्या इतिहासाचा उल्लेख केलेला नाही. इंदोरचे तुकोजी होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसाठी दिले होते ते कुत्र्याच्या समाधी साठी दिले नसल्याचे सांगितले वाघ्या कुत्रा बाबत आपण सरकारला कोणताही ऑटिमेंट दिला नाही तर शासनाने 31 मे पर्यत गडकिल्ले वरील सर्व अतिक्रमण हटविणार असल्याचे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT