Central Railway news 
रायगड

Central Railway news | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले

'महानगरी'च्या टर्मिनलमध्येही बदल करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे

पुढारी वृत्तसेवा

रोहे: रेल्वेच्या परिचालन कारणास्तव मध्य रेल्वेने अनेक महत्त्वाच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात आणि टर्मिनलमध्ये मोठे बदल केले आहेत. एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या या बदलांमुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. विशेषतः 'महानगरी एक्सप्रेस' आता वाराणसीऐवजी बनारस स्थानकावरून धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी कृपया वरील बदलांची नोंद घ्यावी व त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

खालील गाड्यांच्या आगमन/प्रस्थान वेळांमध्ये सुधारणा

CSMT- अमरावती एक्सप्रेस

(ट्रेन क्रमांक 12111- सुधारित वेळापत्रक दि. १४.०४.२०२६ पासून)

CSMT : प्रस्थान २०.५० वा. (पूर्वी २०.०५ वा.)

दादर : आगमन २१.०२ वा., प्रस्थान २१.०५ वा.

ठाणे : आगमन २१.१७ वा., प्रस्थान २१.२० वा.

कल्याण : आगमन २१.४७ वा., प्रस्थान २१.५० वा.

इगतपुरी : आगमन २३.३० वा., प्रस्थान २३.३५ वा.

CSMT - नागपूर दुरांतो एक्सप्रेस

(ट्रेन क्रमांक 12289 - सुधारित वेळापत्रक दि. १४.०४.२०२६ पासून)

CSMT : प्रस्थान २०.३५ वा. (पूर्वी १९.५५ वा.)

नागपूर - CSMT दुरांतो एक्सप्रेस

(ट्रेन क्रमांक 12290 - सुधारित वेळापत्रक दि. १४.०४.२०२६ पासून)

CSMT : आगमन ०७.५० वा. (पूर्वी ०८.०५ वा.)

दादर - हुबळी एक्सप्रेस

(ट्रेन क्रमांक 17318 - सुधारित वेळापत्रक दि. १४.०४.२०२६ पासून)

दादर : प्रस्थान २०.०५ वा. (पूर्वी २०.१५ वा.)

ठाणे : आगमन २०.२२ वा., प्रस्थान २०.२५ वा.

पनवेल : आगमन २१.०८ वा., प्रस्थान २१.१० वा.

CSMT - बेंगळुरू एक्सप्रेस

(ट्रेन क्रमांक 11301 - सुधारित वेळापत्रक दि. १४.०४.२०२६ पासून)

CSMT : प्रस्थान ०७.५५ वा. (पूर्वी ०८.१० वा.)

दादर : आगमन ०८.०७ वा., प्रस्थान ०८.१० वा.

कल्याण : आगमन ०८.४२ वा., प्रस्थान ०८.४५ वा.

लातूर - CSMT एक्सप्रेस

(ट्रेन क्रमांक 22108 - सुधारित वेळापत्रक दि. १३.०४.२०२६ पासून)

CSMT : आगमन ०८.०० वा. (पूर्वी ०७.५५ वा.)

सोलापूर - CSMT एक्सप्रेस

(ट्रेन क्रमांक 12116 - सुधारित वेळापत्रक दि. १३.०४.२०२६ पासून)

CSMT : आगमन ०६.३० वा. (पूर्वी ०६.३५ वा.)

बिदर - CSMT एक्सप्रेस

(ट्रेन क्रमांक 22144 - सुधारित वेळापत्रक दि. १६.०४.२०२६ पासून)

CSMT : आगमन ०८.०० वा. (पूर्वी ०७.५५ वा.)

CSMT - वाराणसी महानगरी एक्सप्रेसचे टर्मिनल व वेळापत्रक बदल

  • CSMT - बनारस महानगरी एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22177)

आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१५ वा. प्रस्थान करेल (पूर्वी ००.१० वा.) आणि बनारस येथे ०३.४५ वा. पोहोचेल (पूर्वी वाराणसी येथे ०३.३५ वा.).

  • बनारस - CSMT महानगरी एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22178)

आता बनारस येथून ०९.४५ वा. प्रस्थान करेल (पूर्वी वाराणसी येथून १०.०० वा.) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ११.४० वा. पोहोचेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT