रोहे : आषाढी एकादशीच्या अनुपन सोहळ्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली असून, २२ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरजसाठी ५४ आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. त्यामुळे भाविकांना याचा फायदा होणार आहे.
आरक्षण दिनांक १ जुलै २०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
आषाढीच्या एकादशी दरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी गरजेनुसार अतिरिक्त विशेष गाड्याही चालवण्यात येतील. अनारक्षित डब्यांची तिकिटे युटीयस प्रणालीद्वारे बुक करता येतील; यासाठी सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या अनारक्षित प्रवासासाठी लागू असलेले सामान्य दर आकारले जातील.
प्रवासी तिकीट बुकिंगसाठी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात.या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा असे आवाहन मध्य रेल्वे कडुन करण्यात आले आहे.
या आहेत विशेष गाड्या
नागपूर - मिरज विशेष गाडी (४ सेवा)गाडी , नवीन अमरावती पंढरपूर विशेष गाडी (४ सेवा ), खामगाव - पंढरपूर विशेष गाडी (४ सेवा), लातूर पंढरपूर विशेष गाडी (८ सेवा), भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी (४ सेवा) , कोल्हापूर कुर्डुवाडी अनारक्षित विशेष गाडी (१६ सेवा) , पुणे मिरज अनारक्षित विशेष गाडी (१४ सेवा)